कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयाची कोविड मान्यता गेली, आता सुधारणांसाठी चव्हाणांचे 1 कोटी

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सोय नसतानाही उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण ठेवले गेले.
karad sub district hospital lost covid grade
karad sub district hospital lost covid grade

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनासारख्या महाभयंकर स्थितीत कऱ्हाडच्या सौ. वेणूताई उपजिल्हा रुग्णालय अर्थात कॉटेज हॉस्पिटलचे काम अत्यंत निराशाजनक झाले. त्यामुळे रुग्णालयाची कोविड हॉस्पिटलची मान्यताही काढून घेण्यात आली. मात्र, या कारणांना पाठीवर टाकून उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा अद्ययावत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणाला एक कोटींचा निधी देण्याची
तयारी दर्शवली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची सोय नसतानाही उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण ठेवले गेले. रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नाही. वॉर्डात स्वच्छतेचा अभाव आहे. रुग्णांकडे नीट लक्ष न दिल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार होताना दिसत नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे त्या काळात झाल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन आमदार चव्हाण यांनी पुन्हा उपजिल्हा रुग्णालयाला अद्ययावत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी त्यांनी एक कोटींचा निधी शासनाकडून आणण्याचे जाहीरपणे मान्य केले आहे. आमदार चव्हाण म्हणाले, "कोविड हॉस्पिटलची मान्यता जाणे योग्य नाही. तेथे अनेक अद्ययावत सुविधा आहेत. मात्र, तेवढे असूनही त्या रुग्णालयाची कोविडची मान्यता रद्द होत असेल तर कठीण स्थिती आहे. त्यामुळे त्या हॉस्पिटलला पुन्हा एकदा अद्ययावत
करण्याचा आराखडा हाती घेत आहे. त्यासाठी एक कोटींचा निधी देऊ; मात्र त्यासाठी प्रसासकीय पातळीवर प्रस्ताव आला पाहिजे.'' 

आता आरोग्य विभागासह जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपजिल्हा रुग्णालयात काय सुविधा अपेक्षित आहेत, त्याचा प्रस्ताव तातडीने आमदार चव्हाण यांच्याकडे देण्याची गरज आहे. तो येताच त्वरित त्या प्रस्तावानुसार राज्य शासनाकडून एक कोटींचा निधी आणण्याची जबाबदारी आमदार चव्हाण घेणार आहेत. 

"उपजिल्हा रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणासाठी शासनाकडून एक कोटींपर्यंतचा निधी देण्याचा माझा शब्द आहे. त्यामुळे त्या हॉस्पिटलला अधिक अद्ययावत करता येईल. निधी मिळावा यासाठी तेथे काय काय सुविधा देणार, याचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर आला पाहिजे. त्यानंतर लगेच हालचाली करून तो निधीवर्ग करता येऊ शकतो.'' 
-पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री 


अनिल गोटेंनी घेतला सदाभाऊ खोतांच्या ब्लॉगचा समाचार
पुणे : "सदाभाऊ, देवेंद्र फडणवीस तुम्हाला आज परमेश्वरासमान आहेत पण कालांतराने तुम्हाला अनुभव येईल. त्यांच्यासारखा विश्वासघातकी माणूस मी आयुष्यात कधीही पाहिलेला नाही," अशा शब्दांत माजी आमदार अनिल गोटे यांनी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिहिलेल्या ब्लॉगला उत्तर
दिले आहे.

सदाभाऊ खोत यांनी काल एक ब्लॉग लिहून देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करत मराठा समाजातील सरंजामदार देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करत आहेत, अशी टीका करत शरद जोशी यांच्यावरही अशी जातीय टीका झाली होती असे म्हटले होते.  खोत यांच्या ब्लॉगला अनिल गोटे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. त्यांनी पत्रक काढून सदाभाऊ खोत यांना उत्तर दिले आहे.
"आज सदाभाऊ खोत ज्या पक्षात आहेत त्या पक्षात उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, संभाजी राजे भोसले, अकलूजचे मोहिते पाटील हे सरंजामदार आहेत याचा सदाभाऊ खोत यांना विसर पडला आहे का?  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com