जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पालकमंत्री नाराज

जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यबाबत बॅंका दाखवित असलेल्या उदासिनतेबाबत कारवाई करण्याची मागणी मंत्रीमंडळाच्या कॅबीनेट बैठकित करणार आहोत.
Jalgaon guardian minister gulabrao patil warns nationalize and district bank crop loan
Jalgaon guardian minister gulabrao patil warns nationalize and district bank crop loan

जळगाव  : जिल्हयात शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात बॅंकांनी कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकासोबतच शेतकऱ्यांचे 'मायबाप' म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेनेही उदासिनतेचे धोरण राबविले आहे. याबाबत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ओरड आहे. त्यामुळे याबाबत बॅंकावर कारवाईचा मुद्दा आपण मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकित मांडणार आहोत, असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगामासाठी 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. यात जिल्हा सहकारी बॅकेने बॅंकेने 1 लाख 35 हजार 43 शेतकऱ्यांना 442 कोटी 16 लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बॅंकांनी 4 हजार 335 शेतकऱ्यांना 69 कोटी 1 लाख 77 हजार रुपये, ग्रामीण बॅंकांमार्फत 161 शेतकऱ्यांना 1 कोटी 80 लाख 39 हजार रुपये, खाजगी बॅकांमार्फत 1 हजार 505 शेतकऱ्यांना 56 कोटी 15 लाख 27 हजार रुपये याप्रमाणे सर्व बॅंकामिळून जून, 2020 अखेर 569 कोटी 13 लाख 43 हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता पीक कर्जवाटपाचे प्रमाण हे अत्यल्प आहे. विशेष म्हणजे जिल्हा बॅंकेतर्फे अगोदरच 50 टक्केच कर्जवाटपाची भूमिका घेण्यात आली आहे.जिल्हा बॅंकेचे पाच लाख शेतकरी सभासद आहे. त्या प्रमाणात कर्जवाटप झालेल्या शेतकऱ्यांची संख्या केवळ एक लाख 35 हजार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी अद्यापही पीक कर्जापासून वंचित आहे.

याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, पीक कर्जवाटपात राष्ट्रीयकृत बॅंकांची उदासिनता तर दिसून आलीच आहे. परंतु जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकाही शेतकऱ्यांसाठी हात अखडता घेत असल्याचे दिसून येत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची बॅंक म्हणविल्या जाणाऱ्या जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यानां शंभर टक्के कर्ज वितरण करण्याची गरज आहे. मात्र त्यांनी केवळ 50 टक्केच कर्ज देण्याचे धोरण अवलंबिले आहे.राज्यात कोणत्याही जिल्हा बॅंकेने हा नियम लावलेला नाही. केवळ जिल्हा बॅंकेनेच हा नियम लावला आहे हे कोणत्या धोरणात बसते आजही शेतकऱ्यांना कळलेले नाही. या शिवाय राष्ट्रीयकृत बॅंकाची कर्जाची आकडेवारी पाहिल्यास ती अत्यंत कमी दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यबाबत बॅंका दाखवित असलेल्या उदासिनतेबाबत कारवाई करण्याची मागणी मंत्रीमंडळाच्या कॅबीनेट बैठकित करणार आहोत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com