'जनता लॉकडाऊन'च्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी उतरले जळगावच्या रस्त्यावर

दवाखाने व मेडिकल सुरू आहेत. मेडिकलवर औषध आणावयास जाण्यासाठी चार चाकी वदुचाकी वाहन घेवून जाण्यासही बंदी करण्यात आली आहे.
jalgaon collector abhijit raut checks janata lock down situation on roads of jalgaon
jalgaon collector abhijit raut checks janata lock down situation on roads of jalgaon

जळगाव : जळगावसह भुसावळ, अमळनेर शहरातील ‘कोरोना’चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आजपासून एक आठवडा जनता लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्याची अमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी अचानकपणे शहरातील काही भागात जावून रस्त्यावर फिरून केली.

जळगाव जिल्हयात ‘कोरोना’ची रूग्णसंख्या वाढत आहे. विशेषत: जळगाव शहर, अमळनेर आणि भुसावळ येथे रूग्णांची संख्या वाढली असून अनेक भाग हॉटस्पॉट झाले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आजपासून ‘जनता लॉकडाऊन’जाहिर केला आहे. यात अगदी किराणा दुकाने आणि भाजी विक्रीही बंद करण्यात आली आहे. दवाखाने व मेडिकल सुरू आहेत. मेडिकलवर औषध आणावयास जाण्यासाठी चार चाकी व दुचाकी वाहन घेवून जाण्यासही बंदी करण्यात आली आहे. औषध घेण्यासाठी आपल्या परिसरातील जवळच्या मेडिकलवर पायी जायचे आहे. त्यामुळे  कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.

जळगावात लॉकडाऊनचा आज पहिलाच दिवस होता. मात्र आज पहिल्याच दिवशी चांगला इफेक्ट दिसून आला. अनेक भागातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. तसेच भाजी बाजारात खरेदी होणारी गर्दी आज नव्हती कारण भाजी विक्रेत्यांनी दुकाने लावलेली नव्हीत. तसेच शहरात मुख्यबाजार पेठेतील संपूर्ण दुकाने बंद असल्यामुळे त्या भागात शुकशुकाट होता.
 
शहरात ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी व्यवस्थित होते कि नाही हे पाहणीसाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे अचानकपणे रस्त्यावर आले. त्यांनी कोणासही माहिती न देता शहरातील इच्छादेवी चौक, सुभाष चौक, दाणाबाजार या भागात गर्दीच्या भागात जावून पाहणी केली, तसेच त्या ठिकाणी असलेल्या बंदोबस्ताचीही माहिती घेतली. जिल्हाधिकारी अचानक पाहणीसाठी आल्याने त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलीसांची तारांबळ उडाली.  

विजय वडेट्टीवारांवर विनायक मेटेंची टीका

बीड : महाविकास आघाडी सरकारमधील इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सारथी संस्थेच्या कामकाजावरून राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विजय वडेट्टीवार यांचे काम म्हणजे नाचता येईना अन॒ अंगण वाकडे असे असल्याचा टोला शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी लगावला आहे.

'मी ओबीसी असल्यामुळे मराठा समाजाच्या टोळक्यांनी माझ्या विरुद्ध आरोप करण्याचे काम केल्याचा’ आरोप याच प्रकारात मोडत असल्याचेही श्री. मेटे म्हणाले. वडेट्टीवार यांनी या खात्याचे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सारथी संस्थेची शिष्यवृत्ती बंद केली, विविध योजना बंद केल्या, कार्यालयात इंटरनेट नाही, कर्मचारी नाहीत, साधी वेबसाईट देखील नीट सुरु नाही. ही संस्था बंद करण्याच्या दृष्टीने सरकारचा अन त्यांचा प्रयत्न सुरु आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा
समाजातील मुलामुलींना दिशा मिळत होती, प्रगतीसाठी मदत होत होती, ही मदत घालवण्याचे काम राज्य सरकारने आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी  केल्याचा आरोपही विनायक मेटे यांनी केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com