अमित शहांनी हर्षवर्धन पाटलांना दिली या गोष्टीची ग्वाही

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे वजनदार नेते दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांबरोबरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.
Harshvardhan Patil meet Amit Shah
Harshvardhan Patil meet Amit Shah

इंदापूर (जि. पुणे) : सहकार चळवळीने राज्यात मोठे आर्थिक परिवर्तन केले आहे. मात्र, खासगीच्या आव्हानामुळे सहकार चळवळ सध्या अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. या चळवळीस गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी दिल्याची माहिती माजी सहकार मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली. (Harshvardhan Patil meet Amit Shah)

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे वजनदार नेते दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांबरोबरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काही नेते दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले असल्याने राजधानीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत काहीतरी नवीन शिजत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अशिष शेलार, माजी मंत्री सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकार मंत्री अमित शहा तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा करत आहेत. त्याप्रमाणेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीदेखील देशाचे नवनियुक्त सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेवून त्यांच्याशी सहकारातील प्रश्न व अडचणींसंदर्भात चर्चा केली.

सहकारातील प्रश्न आणि अडचणी सोडवून या क्षेत्राला राज्यात आणि देशात चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शहा यांनी या भेटीत दिली आहे. या सर्व घडामोडीत राज्यात सहकार मंत्री म्हणून काम पाहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा : आमदार संजय शिंदे यांचे प्रकरण चौकशीला का येत नाही?
 
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्यात सतत होत असलेल्या भेटी ह्या महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला तसेच भाजपास ताकद देणारी ठरण्याची आशा पक्षातून व्यक्त होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या वाढत्या दिल्लीवारी तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीचा काय लाभ सहकार व हर्षवर्धन पाटील यांना मिळणार, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com