जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रथम आमदार हरीभाऊ महाजन यांचे निधन 

हरीभाऊ आत्माराम महाजन हे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन एरंडोल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
MLA Haribhau Mahajan.jpg
MLA Haribhau Mahajan.jpg

जळगाव :  शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रथम आमदार हरीभाऊ आत्माराम महाजन यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.हरीभाऊ आत्माराम महाजन यांचे रात्री एक वाजता निधन झाले. 

हरीभाऊ आत्माराम महाजन हे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन एरंडोल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. ते जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार होते. नंतर मात्र छगन भुजबळ यांच्यासह त्यांनी पक्षाची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मृत्यूमुळे धरणगावसह परिसरावर शोककळा पसरली असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. हरीभाऊ महाजन यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

छगन भुजबळ हळहळले

“जळगाव जिल्ह्यातील धरणगाव मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ महाजन यांचे निधन झाले. मतदारसंघाच्या विकासासाठी हरिभाऊ महाजन यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेनेत असतांना ते माझे सहकारी आमदार होते. मी शिवसेनेमधून बाहेर पडलो तेव्हा ते भक्कमपणे माझ्यासोबत होते. त्यांच्या निधनाने एक धडाडीचे आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपले आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत आमदार महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली !” अशा शब्दात छगन भुजबळ यांनी हरीभाऊ आत्माराम महाजन यांना श्रद्धांजली अर्पण केली.  

Edited By - Amol Jaybhaye     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com