खेडमध्ये भाजपची मुसंडी; मेदनकरवाडीत रामदास मेदनकर पत्नी व मुलासह विजयी 

तीन गावांमधील प्रत्येकी एका जागेसाठी समसमान मते पडल्याने बरोबरी होऊन चिठ्ठीवर उमेदवार निवडले गेले.
Good success for BJP in Khed Gram Panchayat elections
Good success for BJP in Khed Gram Panchayat elections

राजगुरुनगर (जि. पुणे) : खेड तालुक्‍यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीने झाल्याने निकाल संमिश्र लागले आहेत. अनेक ठिकाणी आमदार दिलीप मोहिते समर्थक निवडून आले असले तरी शिवसेना समर्थकांनाही काही ठिकाणी यश मिळाले आहे, तर भाजपनेही या वेळी चांगली मुसंडी मारली आहे. 

बाजार समितीचे माजी संचालक, भाजपचे रामदास मेदनकर यांचे पॅनेल मेदनकरवाडीत विजयी झाले. ते स्वतः, पत्नी आणि मुलगा असे घरातील तिघेजण निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी वराळे ग्रामपंचायत स्वतःकडे राखली आहे. दावडीत माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना सातपुते पराभूत झाल्या आहेत. 

कळमोडी, जऊळके बुद्रुक आणि आंबोली तीन गावांमधील प्रत्येकी एका जागेसाठी समसमान मते पडल्याने बरोबरी होऊन चिठ्ठीवर उमेदवार निवडले गेले. 

दावडी येथे पंचायत समिती सदस्या वैशाली गव्हाणे यांचे पती संतोष गव्हाणे पराभूत झाले आहेत. खरोशी ग्रामपंचायतीवर भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्या विचाराचे पॅनेल विजयी झाले आहे.

काळूस ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलने वर्चस्व मिळविले आहे. निमगाव ग्रामपंचायतीवर माजी सरपंच अमर शिंदे यांचेच वर्चस्व राहिले आहे. राक्षेवाडीत बाजार समिती संचालक अशोक राक्षे यांनी आपल्या हातात सत्ता ठेवण्याची परंपरा राखली आहे. 

दोंदे येथे ज्येष्ठ नेते सदाशिव कोहिनकर यांच्या विचाराचे पॅनेल विजयी झाले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव जाधव यांचे पॅनेल वाकी खुर्द ग्रामपंचायतीत विजयी झाले. पंचायत समिती सदस्य अरुण चौधरी यांना मानणारे पॅनेल गोलेगाव येथे विजयी झाले. बाजार समितीचे माजी संचालक भाजपचे रामदास मेदनकर यांचे पॅनेल मेदनकरवाडीत विजयी झाले. बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे यांनी आपली चिंबळी ग्रामपंचायत बहुमतात राखली, पण त्यांच्या भावाचा पराभव झाला आहे. 

वाफगाव ग्रामपंचायत पुन्हा माजी उपसभापती राजेश जवळेकर यांच्या हातात आली आहे. मात्र त्यांचे समर्थक संतोष गार्डी यांचा चिंचबाईवाडी येथे पराभव झाला आहे. भोसे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या दिगंबर लोणारी गटाच्या जास्त जागा निवडून आल्या. मरकळ गावात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल लोखंडे यांना मानणारे जास्त लोक निवडून आले आहेत. 

कळमोडी, जऊळके बुद्रुक आणि आंबोली तीन गावांच्या प्रत्येकी एका जागेसाठी समसमान मते पडल्याने बरोबरी होऊन चिठ्ठीवर उमेदवार निवडले गेले. अनेक ठिकाणी एखाद्या दोन जागांच्या फरकाने पॅनेल विजयी झाले आहेत. काही ठिकाणी संपूर्ण बहुमत नसल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून, सरपंच निवडणुकीत सदस्यांची खेचाखेची होणार आहे.

अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यांची कोणत्याही पक्षाशी किंवा नेत्यांशी बांधिलकी नाही. काही ठिकाणी आपलेच जास्त लोक असल्याचे दावे राजकीय नेत्यांकडून केले जात आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com