मुख्यमंत्र्यांचा फोन आला तरच शिवसेनेत येईल, अशी काहींची भूमिका  ः सोनवणेंचा बुचकेंना टोला

दुहीमुळे शिवसेनेची सत्ता गेली आहे.
Former MLA Sharad Sonawane criticizes Asha Buchke
Former MLA Sharad Sonawane criticizes Asha Buchke

जुन्नर (जि. पुणे)  : ‘‘गेली पाच वर्षे जुन्नर तालुक्यात शिवसेनेची सत्ता होती; परंतु आपापासातील दुहीमुळे शिवसेनेची तालुक्यातील सत्ता गेली आहे. मागील पाच वर्षात विकास कामे भरपूर झाली. मात्र, जुन्नर आणि शिरूर मतदारसंघात सत्ता राखता आली नसल्याचे शल्य शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, माजी आमदार शरद सोनवणे यांनी येथे व्यक्त केले. (Former MLA Sharad Sonawane criticizes Asha Buchke)

जुन्नर तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अभियानाचा जुन्नर शहरात समारोप करण्यात आला. त्यात माजी आमदार सोनवणे यांनी वरील कबुली दिली.

या वेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांचे नाव न घेता ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला तरच शिवसेनेमध्ये येईल, अशी काहींची भूमिका आहे. आपल्यातील अहंकारामुळे संघटना विस्कळीत होत असते. पुढील काळात संघटना मजबूत करून आगामी सर्व निवडणुका जिंकून पुन्हा शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता आणण्याचा निर्धार सर्वांनी करावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले. 

शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकणाच्या तयारीने शिवसैनिकांनी पेटून उठले पाहिजे. तसेच, नगर परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजय संपादन करून शिरूर मतदार संघातील विजयाचा श्रीगणेशा करण्याचे आवाहन आढळराव यांनी या वेळी केले.

या वेळी संभाजी तांबे, शरद चौधरी, माऊली खंडागळे, श्याम पांडे, सुवर्णा बनकर, कविता गुंजाळ, अंकिता गोसावी, अविनाश करडीले, वैभव मलठणकर, माऊली होगे, समीर मुलाणी, विशाल परदेशी, रिझवान पटेल, ज्योत्स्ना महाबरे, रुपाली शहा आदींसह जुन्नर शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

जुन्नर शहर प्रमुख चंद्रकांत डोके यांनी प्रास्तविक केले. विकी गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. नगराध्यक्ष श्याम पांडे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com