भाजपच्या माजी आमदाराचे परिश्रम यशस्वी 

चुनाळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने एकहातीसत्ता मिळविली आहे. 13 सदस्यीय चुनाळा ग्रामपंचायतमध्ये १३ ही सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत.
bjp jpg
bjp jpg

चंद्रपूर  : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. 13 सदस्यीय चुनाळा ग्रामपंचायतमध्ये १३ ही सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. 

चुनाळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ-सरळ लढत होती. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत.  

भाजपच्या यशात माजी आमदार तथा भाजपचे जेष्ठ नेते सुदर्शन निमकर यांनी परिश्रम घेतले. माजी आमदार निमकर याचे चुनाळा मूळगाव असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राजुरा तालुक्यातील निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी अटीतटीची झाली होती. 

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने धुरळा उडाला होता. गट-तटाच्या माध्यमातून निवडणूका लढवल्या गेल्या. दरम्यान, अनेक ग्रामपंचायती पक्षीय पातळीवर लढल्या गेल्या आहेत. त्यामध्ये चुनाळा ग्रामपंचायत निवडणूक अधिक चर्चेत आली होती. 


पाटोदा ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल....

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या आदर्श ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे.गेली पंचवीस वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असलेले माजी सरपंच व पाटोदा गावच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर पेरे पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती.

नव्या लोकांना संधी मिळावी म्हणून आपण निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. असे असले तरी त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील ही निवडणुकीत उभी होती. परंतु तीन जागांसाठी मतदान झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला तेव्हा अनुराधा पाटील या पराभूत झाल्याचा समोर आले आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या उमेदवाराला २०८ मते मिळाली तर अनुराधा पेरे पाटील यांना १८३ मते मिळाली आहेत.


मनसे कार्यकर्त्यांचे इंजिन या गावातच धावले 

पंचवीस वर्षाच्या शिवसेनेच्या सत्येला मनसेने अंकुश लावला आहे. जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायत येथे मनसेने मोठा विजय मिळवला आहे. 

जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या जिगाव ग्रामपंचायतीमध्ये मनसेने इतिहास घडवला आहे. तब्बल पंचवीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत मनसेने खेचून आणली आहे. ग्रामपंचायतीत तब्बल नऊपैकी सात जागांवर मनसेने दणदणीत विजय मिळवला आहे. 

निवडणुकीत मनसे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. जिल्ह्यातील महत्त्वाची असलेली जिगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेने पंचवीस वर्ष एकहाती संत्ता राखली होती. मात्र, यंदा शिवसेनेच्या पॅनला धोबीपछाड देत मनसेने बाजी मारली आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळे जिवगाव मधील हा विजय मनसेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com