मुख्यमंत्रीसाहेब बांधावर जाऊन दिलेला शब्द पाळा : आमदार सातपुते 

माळशिरस तालुक्‍यातील सुमारे अठरा-वीस गावांतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Follow the word given by Chief Minister to farmers : MLA Satpute
Follow the word given by Chief Minister to farmers : MLA Satpute

पुणे : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्‍यातील सुमारे अठरा-वीस गावांतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील पिके जमिनीसह वाहून गेली आहेत. अतिवृष्टीने बळिराजा उद्‌ध्वस्त झाला असून त्याला तत्काळ मदतीची गरज आहे, त्यामुळे नुसते पंचनामे नाही तर प्रत्यक्ष मदतीची गरज आहे. मुख्यमंत्रीसाहेब बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळा, असे आवाहन माळशिरस भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांनी केले. 

गेल्या आठवड्यात माळशिरस तालुक्‍यात सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे पिलीव, शिंगोर्णी, बचेरी, बोरगाव, दसूर, तोंडले, बांडले, मळोली, फळवणी यांसह सुमारे अठरा-वीस गावांत शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती वाहून गेली आहे. या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी आमदार सातपुते यांनी केली आहे. 

गेल्या पावसाळ्यात झालेल्या नुकसानीची पुरेशी मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे केवळ पंचनामे करण्याचा सोपस्कर न करता शेतकऱ्यांना तातडीने भरीव स्वरूपाची मदत मिळायला हवी, अशी आग्रही मागणी आमदार सातपुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे अश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन त्यांना खते आणि बियाणे कमी पडणार नाही. प्रत्येक अडचणीच्या वेळी सरकार शेतकऱ्यांबरोबर असेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर आमदार सातपुते यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना त्या आश्‍वासनाची आठवण करून दिली आहे. 

माळशिरस तालुक्‍यातील अनेक रस्ते व पूल पावसाने वाहून गेले आहेत. येत्या काळात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होणार आहे. ऊस वाहतुकीसाठी चांगल्या रस्त्यांची गरज आहे. त्यामुळे खराब झालेले सर्व रस्ते तातडीने दुरूस्त करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याकडे लक्ष द्यावे, असे आमदार सातपुते यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा : अजितदादांच्या सूचनेनुसार पृथ्वीराज जाचक 'छत्रपती'च्या कारभारात सहभागी 

वालचंदनगर (जि. पुणे) ः साखर संघाचे माजी अध्यक्ष आणि नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जुळवून घेणारे पृथ्वीराज जाचक यांनी इंदापूर तालुक्‍यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष असलेले जाचक हे कारखान्यात होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती व संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक व इतर दहा पदाच्या मुलाखती होणार आहेत. त्यासाठी जाचक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित राहण्याची सूचना केली आहे. जाचक संचालक मंडळाच्या बोर्ड मिटींगला उपस्थित राहणार असून अधिकाऱ्यांच्या मुलाखतीही घेणार आहेत, अशी माहिती आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com