आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदीरासाठी पंकजा मुंडेंचे पाच लाख 

प्रभू श्रीरामांच्या आयोध्येत उभारल्या जात असलेल्या मंदीरासाठी निधी संकलनाची मोहिम जिल्ह्यात वेगाने सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपने यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात निधीसंकलन कार्यालयही उभारले आहे.
Five lakhs of Pankaja Munde for Lord Shriram Temple in Ayodhya .jpg
Five lakhs of Pankaja Munde for Lord Shriram Temple in Ayodhya .jpg

बीड : प्रभू श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणी साठी निधी संकलन मोहिम जिल्ह्यात वेगात सुरु आहे. यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला.

माजलगाव येथील मंगळवारी एका कार्यक्रमात त्यांनी निधीचा धनादेश संकलकांकडे सुपूर्द केला. राम मंदिर निर्माणासाठी जिल्हयातून जास्तीत-जास्त निधी संकलन करावे असे, आवाहन मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान जिल्ह्यात गावा- गावात राबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची बैठक पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजलगावच्या सिद्धेश्वर संकुलात पार पडली. अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे.

हे ही वाचा 

मंदिर निर्माणाच्या कार्यात प्रत्येकांनी योगदान देण्यासाठी पुढे यावे, यासाठी निधीचा आकडा महत्वाचा नसून  सर्व स्तरातील लोकांचे योगदान महत्वाचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेशराव आडसकर, अक्षय मुंदडा, मोहन जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक डॉ. पुरुषोत्तम कुलकर्णी, अमरनाथ खुर्पे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सोमवारी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनीही बीडमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निधी संकलनाचे आवाहन केले.
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com