राजकारणात आल्यावर माझे पन्नास टक्के केस पांढरे झाले : रोहित पवार - Fifty percent of my hair turned white when I came into politics: Rohit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

राजकारणात आल्यावर माझे पन्नास टक्के केस पांढरे झाले : रोहित पवार

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 24 जानेवारी 2021

राजकारणात असताना स्वतःचा विचार न करता जनतेचे प्रश्न सोडवण्याला पहिले प्राधान्य द्यावे लागते.  या गोष्टी करत असताना अनेक वेळा तणावाला सामोरं जावे लागते.

जळगाव : राजकारणात असताना स्वतःचा विचार न करता जनतेचे प्रश्न सोडवण्याला पहिले प्राधान्य द्यावे लागते.  या गोष्टी करत असताना अनेक वेळा तणावाला सामोरं जावे लागते. पूर्वीसारखं राजकारण आता सोपं राहिलं नसल्याने सध्या मोठा ताणतणाव असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकारणात आल्यावर माझे पन्नास टक्के केस पांढरे झाले, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे डॅा. भूषण मगर यांच्या विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटचे उद्घाटन आणि युवकांशी संवाद या कार्यक्रमाच्या वेळी ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते. 

केंद्र सरकारकडून राजकारणासाठी तापास यंत्रणांचा वापर

ईडीची नोटीस आतापर्यंत कोणत्याही भाजप नेत्याला आलेली नाही. ती अन्य पक्षातील नेत्यांनाच म्हणजे पवार साहेबांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना आलेली दिसते. या सर्वांचा अभ्यास केला तर केंद्र सरकार तपास यंत्रणांचा वापर राजकारणासाठी तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आसल्याचे रोहित पवार म्हणाले. 

युवकांमध्ये मोठी ताकद आहे...

युवकांमध्ये मोठी ताकद आहे. या ताकदीला जर आपण दिशा देऊ शकलो नाही तर ही ताकद वाया जाऊ शकते आणि चुकीच्या मार्गाने लागली तर मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात.

युवकांना ताकद देण्यासाठी आघाडी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. मात्र यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे. युवकांनी आपला वापर कुणी करून घेणार नाही याची काळजी घ्यायला हवी असा सल्लाी रोहित पवार यांनी दिला. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख