कंगनाचे बोलविते धनी हे तर भाजपचेच नेते : माजी आमदाराचा आरोप - Ex mla anil gote criticizes bjp and Kangana | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाचे बोलविते धनी हे तर भाजपचेच नेते : माजी आमदाराचा आरोप

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

कंगनाच्या आडून भाजप राजकीय लढाई लढत असल्याचा आऱोप

जळगाव : भारतीय राजकारणात वाचाळ महिलांना पुढे करुन त्यांच्या पदराआडून विरोधकांना नामोहरम करण्याचे नवे तंत्र भाजपाने अवलंबले आहे. कांगावाखोर आणि वचाळ बायकांना आघाडी सांभाळायला लावायला लावण्यात भाजपा नेते धन्यता मानत आहेत. या नव्या रणनितीचा प्रारंभ सुशांत सिंग प्रकरणाचा आधार घेऊन केला,``असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.

"मुंबई कुणाच्या बापाची नाही. मला मुंबईत येण्यापासून कुणी रोखू शकत नाही" असल्या घोषणा त्यातून केल्या गेल्या. दुसऱ्यांच्या मुली पळविण्याचा खुले आम प्रोत्साहन देणाऱ्या भाजपाच्या आमदारांनी पराकोटीचा निर्लज्जपणा दर्शवून दिवसातून चादरी बदलणाऱ्या कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी केली. सत्ताच्यूत झाल्यामुळे बुद्धिभ्रष्ट् झालेल्या भाजपला राणी लक्ष्मीबाईंचा अनमान झाल्याचे भान राहिले नाही.  मुंबई कंगनाच्या बापाची की नवऱ्याची याच्याशी कुणाला काडी इतपत घेणे देणे नाही, अशी टीका गोटे यांनी केली.

महाराष्ट्रा विरोधी गरळ ओकून घेण्याचा कार्यक्रम भाजपाचे नेते कंगना रनौत हिच्याकडून पार पाडून घेत आहेत. पंतप्रधानांकडून  लाडावलेल्या आणि Y सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आलेली कंगणा रनौत भूपुत्र देशाच्या अन्नदात्याला खुशाल अतिरेकी आतंकवादी म्हणते. पंतप्रधान तिच्या ट्विटची दखल घेतात. खरी मेख तर पुढेच आहे. पंतप्रधानांकडून केलेल्या ट्विटर मधे कंगना रनौत आपण शेतकऱ्यांना अतिरेकी किंवा आतंकवादी संबोधल्या बद्धल पुसटशी का होईना नाराजी व्यक्त केली नाही. देशातील शेतकरी आतंकवादी अथवा अतिरेकी आहेत. हे भाजपाला असेच जनतेच्या मनावर बिंबवायचे आहे. कंगनावैनी नेमके हेच करीत आहेत. म्हणूनच माझा दावा आहे की. रनौतवैनींचे वक्तव्य भाजपा पुरस्कृत आहे, अशी टीका त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख