राष्ट्रवादीच्या नव्या महिला जिल्हाध्यक्षाची आठवडाभरात होणार घोषणा  - District President of Solapur NCP Women's Congress to be announced in a week : Chakankar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

राष्ट्रवादीच्या नव्या महिला जिल्हाध्यक्षाची आठवडाभरात होणार घोषणा 

प्रमोद बोडके
सोमवार, 19 जुलै 2021

त्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

सोलापूर : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आज (ता. १९ जुलै) शहरातील राष्ट्रवादी भवनात इच्छुक महिलांच्या मुलाखती झाल्या. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या मुलाखती घेतल्या. येत्या आठवड्यात सोलापूरच्या नव्या महिला जिल्हाध्यक्षांची घोषणा होईल, अशी माहितीही प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी या वेळी बोलताना दिली. (District President of Solapur NCP Women's Congress to be announced in a week : Chakankar)
 
सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या महिलांच्या मुलाखती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पश्‍चिम महाराष्ट्राच्या निरीक्षक भारती शेवाळे, सोलापूरच्या निरीक्षक दीपाली पांढरे आदी उपस्थित होते. रंजना हजारे, शलाका मरोड पाटील, सुवर्णा बागल, साधना राऊत, ऍड. सुप्रिया गुंड पाटील, उज्ज्वला पाटील, ज्योत्सना पाटील, सुवर्णा शिवपुरे व जयश्री पवार या नऊ महिलांनी आज जिल्हाध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या आहेत. 

हेही वाचा : कोकणात भाजपचा शिवसेनेला दे धक्का

पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षा अनिता नागणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी आज (ता. १९ जुलै) मुलाखती घेण्यात आल्या आहेत. नव्या महिला जिल्हाध्यक्षांच्या काळात नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

मुलाखतीनंतर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करून संबंधितांना नियुक्तीपत्र देऊन जबाबदाऱ्या दिल्या जातील. आजचा मुलाखतीसाठी महिला भगिनींचा उत्साह पाहता येणाऱ्या महापालिका निवडणुका, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयात मोठा वाटा हा महिलांचा असेल, असा विश्‍वास आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख