सोलापुरातील लॉकडाऊनबाबत शनिवारी निर्णय होणार

जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उद्या एकत्रित बसून कृती आराखडा तयार करावा आणि त्यानंतर लॉकडाऊन बाबत निर्णय घ्यावा.
decision of lock down in solapur city will be taken on Saturday
decision of lock down in solapur city will be taken on Saturday

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुर्ण संचारबंदी (लॉकडाऊन) बाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी बैठक घेऊन उद्या निर्णय जाहीर करतील, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितले.  

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय जाहिर करण्याबाबत सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह सर्व गटनेते आणि प्रशासकीय अधिकारी यांची व्यापक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

बैठकीस जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, मनपा आयुक्त पी.शिवशंकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त अजयसिंह पवारउपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते महेश कोठे, गटनेते आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, किसन जाधव, रियाज खैरादी, आदि उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूर शहरातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याबाबत विविध घटकांशी विचारविनिमय केला त्यानंतर काही जणांनी लॉकडाऊन केला जावा तर काहींनी करु नये अशी मते व्यक्त केली. मात्र याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उद्या एकत्रित बसून कृती आराखडा तयार करावा आणि त्यानंतर लॉकडाऊन बाबत निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले. लॉकडाऊन जाहिर करण्यापुर्वी नागरिकांना पुरेशी कल्पना दिली जावी, नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

लॉकडाऊन जाहिर केल्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने रॅपिड टेस्टींग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट यांचा आराखडा तयार करावा. संशयास्प्द व्यक्तींना अलगीकरण केले जावे, अशा सूचना श्री भरणे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

बैठकीत महापौर यन्नम यांनी पोलिस प्रशासनाने चोख लॉकडाऊन बंदोबस्त ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.  आमदार प्रणिती शिंदे यांनी गरीबांना पुरेसे अन्नधान्य वाटप व्हायला हवे,  असे सांगितले  विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी डॉक्टरांची मिटींग घ्यावी. कोरोना बाधितांचे रिपोर्टींग व्यवस्थीत सुधारणा कराव्या, असे सांगितले. उपमहापौर राजेश काळे, सभागृहनेते श्रिनिवास करली, गटनेते चेतन नरोटे, किसन जाधव, आनंद चंदनशिवे, रियाज खैरादी, नगरसेवक गणेश पुजारी, प्रथमेश कोठे यांनी आपली मते मांडली.

बैठकीस डॉ. वैश्यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, गजानन गुरव, उपायुक्त बापू बांगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे आदी उपस्थित होते.

edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com