बदनामी करून नगरसेवकाकडे खंडणी मागणे माजी उपसरपंचाला भोवले

त्यावेळी संशयित आरोपी व त्यांची टोळी तेथे हजर होती.
Crime against Chakan Deputy sarpanch for demanding ransom from corporator
Crime against Chakan Deputy sarpanch for demanding ransom from corporator

चाकण (जि. पुणे) : बदनामी करण्याच्या उद्देशाने चाकण नगरपालिकेच्या नगरसेवकाविरोधात एका महिलेला पोलिस ठाण्यात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी पाठवून आणि ते प्रकरण मिटविण्यासाठी १५ लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चाकणचा माजी उपसरपंच, एक पत्रकार तसेच तथाकथित संघटनेच्या काही महिला कार्यकर्त्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime against Chakan Deputy sarpanch for demanding ransom from corporator)

दरम्यान, या प्रकरणी संगीता नाईकरे, पत्रकार कल्पेश भोई, गीतांजली भस्मे आणि आणखी एकजण अशा चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश राठोड यांनी दिली. 

चाकणचे नगरसेवक किशोर ज्ञानोबा शेवकरी (रा. चाकण, ता. खेड) यांनी याबाबत चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार, माजी उपसरपंच प्रीतम शंकरसिंग परदेशी, संगीता वानखेडे, कांतिलाल सावता शिंदे, गीतांजली भस्मे, पत्रकार कल्पेश भोई, संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, कुणाल राऊत, प्रणीत (पूर्ण नाव माहीत नाही) आदी नऊ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी किशोर शेवकरी यांनी पोलिसांना याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज व मोबाईलवरील व्हाॅटसअप चॅटिंग मेसेज पुरावे दिले आहेत. सलोनी वैद्य ही महिला शेवकरी यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देत आहे, असे गीतांजली भस्मे व इतरांनी शेवकरी यांना सांगितले. तसेच हे प्रकरण मिटविण्यासाठी पंधरा लाख रूपयांची खंडणीही शेवकरी यांच्याकडे मागितली. नगरसेवक शेवकरी यांच्याकडे वरील संशयित आरोपींनी वारंवार पैशांची मागणी केली. त्यानंतर शेवकरी यांनी ता. ९ सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली.

फिर्यादी शेवकरी यांना हे प्रकरण मिटविण्यासाठी वरील संशयित आरोपींनी दिघी येथे एका फ्लॅटवर बोलविले होते. त्यावेळी शेवकरी त्यांच्या मित्रांसह तेथे गेले होते. त्यावेळी संशयित आरोपी व त्यांची टोळी तेथे हजर होती. त्यावेळी शेवकरी यांनी भीतीपोटी संशयितांना पंधरा लाख रूपये देऊ, असे सांगितले होते. त्यानंतर बारा लाख रूपयांवर तडजोड करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com