सोलापूरचे भाजपचे उपमहापौर राजेश काळेंविरुद्ध गुन्हा दाखल 

डी- मार्ट चौकासमोरील सुनिल पोतदार यांची 13 हजार स्क्‍वेअर फूट मोकळी जागा आहे.
A case has been registered against BJP Deputy Mayor Rajesh Kale of Solapur
A case has been registered against BJP Deputy Mayor Rajesh Kale of Solapur

सोलापूर : सोलापूर शहरातील डी-मार्ट चौकासमोरील हॉटेल वैष्णवीजवळील जागेच्या वादातून सोलापूरचे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांनी ऍट्रोसिटीची व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या वेळी झालेल्या धक्‍काबुकीत त्यांच्यासोबत असलेल्यांपैकी एकाने गळ्यातील सात तोळ्याची चैन चोरून नेल्याची फिर्याद रवींद्र अप्पासाहेब भोपळे (रा. मजरेवाडी) यांनी विजापूर नाका पोलिसांत दिली.

तर माझ्या ताब्यातील जागेवर अतिक्रमण करून टाकलेल्या टपऱ्यासंदर्भात जाब विचारताना रवींद्र भोपळे व संतोष पवारसह अन्य साथीदारांनी जातिवाचक शिवीगाळ करून गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याची फिर्याद काळे यांनी दिली आहे. 

डी- मार्ट चौकासमोरील सुनिल पोतदार यांची 13 हजार स्क्‍वेअर फूट मोकळी जागा आहे. या जागेची पॉवर ऑफ ऍटर्नी उपमहापौर राजेश काळे यांच्याकडे असून त्या जागेचा विकास करण्यासंदर्भातही त्यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, रवी भोपळे, संतोष पवार यांनी त्याठिकाणी अतिक्रमण करुन अनधिकृत टपऱ्या टाकल्या आहेत.

त्यासंदर्भात जाब विचारायला गेल्यानंतर भोपळे व पवार यांनी जातिवाचक शिवीगाळ केली. त्यावेळी झालेल्या धक्‍काबुकीत गळ्यातील सोन्याची चैन तुटली. संतोष पवार याने ती चैन स्वत:च्या खिशात टाकल्याचेही राजेश काळे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. 

राजेश काळे यांनी रविवारी (ता. 18) टपऱ्या काढल्या नाही तर ऍट्रोसिटी दाखल करून जीवे ठार मारेन अशी धमकी दिली. त्यावेळी झालेल्या धक्काबुकीत सात तोळ्याची चैन कोणीतरी काढून घेतल्याची विरोधी फिर्याद भोपळे यांनी दिली आहे. काळे यांच्या फिर्यादीनुसार भोपळे, पवार यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुध्द ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्‍त प्रीती टिपरे करीत आहेत. भोपळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे तपास करीत आहेत. 

 Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com