ठरलं! पंढरपूरमध्ये भाजपकडून समाधान आवताडे मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
BJP nominates Samadhan Avtade for Pandharpur Assembly election
BJP nominates Samadhan Avtade for Pandharpur Assembly election

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आवताडे हे मंगळवेढा येथील उद्योगपती व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. आवताडे यांची उमेदवारी जाहीर करत भाजपने आघाडी घेतली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (ता. 30) शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर आज दिल्ली येथे केंद्रीय भाजप समितीने आवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.

भाजपकडून आवताडे यांच्यासह विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले आदी इच्छुक होते. परंतु परिचारक यांनी निवडणुक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर भाजपने परिचारकांच्या सहमतीनेच उमेदवारी जाहीर केल्याचे समजते. त्यामुळे आवताडेंच्या मागे त्यांची ताकद उभी राहणार हे स्पष्ट आहे.

राष्ट्रवादीला तोडीस तो़ड उमेदवार म्हणून भाजपने समाधन आवताडे यांना मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीबाबत अद्याप संभ्रम आहे. राष्ट्रवादीचे दिवगंत आमदार भारत भालके यांचे पुत्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांनी उमेदवारी मागितली आहे. पण पक्षाने अद्याप त्यांच्या नावार शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत असवस्थता वाढत चालली आहे. 

महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील आणि शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे याही निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची भीती राष्ट्रवादीला आहे. याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसू शकतो. 

दरम्यान, मागील दोन  निवडणुकांमध्ये परिचारकांचा काही हजार मतांनी पराभव झाला असला तरी आजही पंढपूर आणि मंगळवेढा तालुक्यात त्यांची राजकीय ताकद मोठी आहे. तालुक्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, दूध संस्था, साखर कारखाने, बॅंका, पंतसंस्थांसह अनेक शैक्षणिक संस्थांवर परिचारकांचे वर्चस्व आहे. ही आवताडेंसाठी जमेची बाजू आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com