भाजपच्या आमदार-खासदारांनी मांडला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या 

भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार जादा असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याला वैद्यकीय सुविधांपासून वंचित ठेवले जातआहे की काय?
BJP MLAs-MPs staged agitation in front of District Collector's Office in Solapur
BJP MLAs-MPs staged agitation in front of District Collector's Office in Solapur

सोलापूर  ः कोरोनावरील (Corona) उपचारांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि लसचा पुरवठा सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील लोकसंख्यच्या मानाने अपुरा होत आहे. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) आमदार (MLA) आणि खासदारांनी (MP) आज  (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ (Collector Office) लाक्षणिक उपोषण (strike) केले. (BJP MLAs-MPs staged agitation in front of District Collector's Office in Solapur)  

या लाक्षणिक उपोषणात खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, या लोकप्रनिनिधींसह संतोष पाटील, विजयराज डोंगरे, अरुण बारबोले, धैर्यशील मोहिते-पाटील हेही सहभागी झाले होते. या वेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


कोरोना उपचारांसाठी आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन, तसेच कोरोना लशींचा पुरवठा सोलापूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या मानाने अपुऱ्या प्रमाणात मिळत आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचा कोटा पुणे विभागातील इतर जिल्ह्यांकडे वळविण्यात येत आहे. हा दुजाभाव करुन राज्य सरकार सोलापूर जिल्ह्यातील लोकांचे प्राण घेत आहे. जिल्ह्यातील या प्रश्नांसदर्भात आम्ही पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नाही; म्हणून आज हे आंदोलन करावे लागले. राज्य सरकारने हा दुजाभाव वेळीच थांबवून सोलापूर जिल्ह्याला पुरेसा कोटा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात राज्यातील सर्व जिल्ह्यांना वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, याही परिस्थितीत सोलापूर जिल्ह्याबाबत दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे राज्यातील सरकारला सोलापूर जिल्ह्याची ऍलर्जी आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार जादा असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याला वैद्यकीय सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे की काय, असा आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी केला.

सोलापूर जिल्ह्याला रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सीजन व लस वितरणाबाबत सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. सोलापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत लस व रुग्णसंख्येच्या तुलनेत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. सोलापूर जिल्ह्याला तीन लाख, तर पुणे जिल्ह्याला 10 लाख लसचा पुरवठा होत आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या बाबतीतही असेच चित्र आहे. सोलापूर जिल्ह्याला 500, तर पुण्याला पाच हजार इंजेक्‍शनचा पुरवठा होत आहे, असे  भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com