bjp leader girish mahajan criticizes health minister rajesh tope | Sarkarnama

जळगावचे जिल्हाधिकारी, डिन बदलूनही काही उपयोग झाला नाही: गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 जून 2020

कोविड रूग्णालयाच्या उपचारासाठी जिल्हा रूग्णालय राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे 'नॉन कोविड' रूग्णांना उपचारासाठी अक्षरश:भटकावे लागत आहे. त्यामुळे या रूग्णांचाही मृत्यू होत आहे.

जळगाव : जिल्हयात कोरोना रूग्णांच्या मृत्यूची संख्या वाढतेय. संशयीत रूग्णांना कोणतेही उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यात भेट दिली, परंतु परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही, असा आरोप राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. 'कोरोना'संदर्भात सर्वपक्षीय बैठकिनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जळगाव जिल्हयात 'कोरोना' रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार खासदारांची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होते. बैठकिला जिल्ह्यातील आमदार खासदारांची उपस्थिती होती. 

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना आमदार गिरीश महाजन म्हणाले, जिल्ह्यात कोविड रूग्णांच्या वाढणाऱ्या संख्येबाबत सर्व आमदार, खासदारांनी चिंता व्यक्त केली. रूग्णांना अद्यापही उपचाराच्या चांगल्या सुविधा नसल्याच्या तक्रारी आहेत. अद्यापही व्हेंटीलेटरची सुविधा नाही, तसेच या रूग्णांना जेवणही चांगल्या प्रकारे दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या रूग्णांना उपचाराच्या चांगल्या सुविधा द्याव्यात अशी सर्वच आमदार खासदारांनी मागणी केली आहे.
 
जिल्हा रूग्णालय "नॉन कोविड'करा

कोविड रूग्णालयाच्या उपचारासाठी जिल्हा रूग्णालय राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे 'नॉन कोविड' रूग्णांना उपचारासाठी अक्षरश:भटकावे लागत आहे. त्यामुळे या रूग्णांचाही मृत्यू होत आहे. त्यामुळे 'नॉन कोविड' रूग्णांचे जिल्हा रूग्णालयात करण्यात यावे अशी मागणी सर्व पक्षीय आमदार खासदारांनी केली असल्याचेही त्यानी सांगितले.
 
आरोग्यमंत्री आले पण...

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावरही त्यांनी टिका केली, ते म्हणाले, आरोग्यमंत्री राजेश टोपे या ठिकाणी आले. त्यांनी पाहणी केली आठ दिवसात चांगले उपचार मिळतील असे त्यांनी सांगितले होते. त्यासाठी त्यांनी या ठिकाणच्या जिल्हाधिकारी, डिन सह प्रशासन यंत्रणा बदलली परंतु अद्यापही कोविड रूग्णांवर चांगले उपचार होत नाही. उलट कोविड रूग्णांचा डेथ रेट वाढला आहे. देशात जळगावचा डेथ रेट सर्वात जास्त सात आहे. जिल्हा प्रशासनाने कोविड रूग्णांच्या उपचाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही केल्याचे त्यानीं सांगितले. 

उद्या दुपारपासून पंढरपुरमध्ये संचारबंदी: SP मनोज पाटील

सोलापूर : आषाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पंढरपूर शहर व आजूबाजूच्या परिसरात उद्या, मंगळवार (दि. 30) दुपारी दोन वाजल्यापासून ते गुरुवारी, दोन जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर पडता येणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख