अण्णा, केजरीवाल विरोधात आंदोलनासाठी पुन्हा दिल्लीत या : भाजपचे निमंत्रण

तुमच्या नावावर जो पक्ष स्थापन झाला त्याचे हे पतन तुम्हालाही मान्य नसेल. त्यामुळेच `आप` सरकारविरूध्द भाजप जे जनआंदोलन करत आहे त्यात आपण सहभागी व्हावे अशी विनंती भाजपने अण्णा हजारे यांनाकेली आहे.
anna-hajare-31janf.
anna-hajare-31janf.

नवी दिल्ली ः दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) भ्रष्ट, दंगलखोर व महिलाविरोधी सरकारविरूध्द भाजपतर्फे चालू असलेल्या जनआंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे साकडे दिल्ली भाजपने हजारे यांना घातले आहे.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी खुद्द अण्णांनाच याबाबतची विनंती केली आहे. त्यांनी हजारे यांना "करबध्द प्रार्थना' करणारे एक पत्रही लिहीले आहे. ईशान्य दिल्लीत यावर्षी झालेली जातीय दंगल `आप`द्वारेच नियोजित होती, असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 

विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या भाजपने आता 2022 मधील महापालिकांच्या निवडणुकीसाठी `आप`विरूध्द जोर लावला आहे. अण्णा हजारे यांच्या रामलीला मैदानावरील 2011 च्या जनआंदोलनामुले अमर्याद भ्रष्टाचाराचे आरोप होणाऱ्या तत्कालीन यूपीए सरकारविरूध्द देशभरात मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्या आंदोलनातूनच निर्माण झालेल्या "आप' ला दिल्लीकरांनी सलग तीनदा घवघवीत बहुमताने दिल्लीची सत्ता सोपविली व पंजाबमध्ये हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष आहे.

 
मात्र 2014 नंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल हजारे यांचे मत प्रतिकूल झाले. त्यांनी राजकारणात जायला नको होते असे हजारे यांचे मत आहे. यामुळेच गुप्ता यांनी हजारे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की दिल्लीत आप हा पक्षच राजकीय व आर्थिक भ्रष्टाचाराचा समानार्थी शब्द बनला आहे. भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ राजकारणाच्या नावावर सरकारमध्ये आलेल्या याच पक्षाने राजकीय शुचितेचे मापदंड उध्वस्त केल आहेत. यामुळे नव्या पिढीचा व्यवस्थेवरील विश्‍वास उडून जाण्याचा धोका संभवतो. आप पक्षाचे दिल्ली सरकार महिलाविरोधी आहे. यंदा फेब्रुवारीत दिल्लीत झालेल्या दंगलीत 53 लोक मृत्यूमुखी पडले ती सारी दंगलच आपद्वारे नियोजित होती. तुमच्या नावावर जो पक्ष स्थापन झाला त्याचे हे पतन तुम्हालाही मान्य नसेल. त्यामुळेच `आप` सरकारविरूध्द भाजप जे जनआंदोलन करत आहे त्यात आपण सहभागी व्हावे अशी विनंती गुप्ता यांनी अखेरीस केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com