पडळकरांचा सत्कार केलेले माजी आमदार म्हणाले, त्यांचे विधान चुकीचेच!

आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल मी त्यांचा सत्कार केला.मात्रत्यांनी थोर नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे समर्थन करता येणार नाही. ते विधान चुकीचे आहे.
 bjp ex mla vilasrao jagtap criticizes gopichand padalkars controversial statement
bjp ex mla vilasrao jagtap criticizes gopichand padalkars controversial statement

पुणे : "शरद पवार यांच्याबद्दलचे गोपीचंद पडळकर यांचे विधान चुकीचे आहे. त्यांनी ते विधान करायला नको होतं." असं मत जत मतदारसंघातील भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केले आहे.

काल सांगली जिल्ह्यातील जतमध्ये भाजपचे आमदार गोपींचंद पडळकर यांचा सत्कार माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला. जगताप हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षात होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली होती. 2014 साली ते भाजपमध्ये आले. त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. 2019 साली त्यांचा पराभव झाला.

काल आमदार पडळकर यांचा जगताप यांनी सत्कार केला. त्याबाबत बोलताना ते म्हणाले,"आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल मी त्यांचा सत्कार केला.मात्र त्यांनी थोर नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे समर्थन करता येणार नाही. ते विधान चुकीचे आहे."  

पडळकरप्रकरणी अनिल गोटेंचा हल्लाबोल
पुणे : "शरद पवार यांना गोपीचंद पडळकरांनी कोरोना असं म्हटले असले तरी मी देवेंद्र फडणवीस यांना 'महाराष्ट्राला लागलेला महारोग" असं म्हणणार नाही. वस्तुस्थिती असली तरी मी तसे म्हणणार नाही," असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे.

"धनगर समाजातील माझ्यासह नानाभाऊ कोकरे, अण्णासाहेब डांगे, प्रकाश शेंडगे हे भाजपच्या जातीवादाचे बळी आहेत. पडळकरांना भाजपच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हा ते शुद्धीवर येतील, "असं गोटे यांनी म्हटलं आहे. 

"आमदारकी मिळून आठ दिवसही झाले नाहीत तोवर पडळकर यांना आमदारकीची नशा चढली आहे. पडळकर यांना भाजपच्या उच्चवर्णीय विचारांची पुसटशीही कल्पनाही आलेली नाही. एका आमदारमुळे ते पुरते भाजपचे समर्थक होऊन बसले पण एक दिवस त्यांना भाजपच्या धोकाबाजीचा झटका बसेल, तेव्हा त्यांना कळेल," असे गोटे यांनी म्हटले आहे.

"नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्यासारख्या बुद्धिमान माणसाला भाजपने देशोधडीला लावले. त्यांच्या स्वतःच्या त्याकाळात कार होत्या पण आज त्यांचे धुळ्यात घरही नाही. १९५७ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत ते जनसंघाचे खासदार होते त्यांनी पक्ष वाढीसाठी अहोरात्र कष्ट घेतले मात्र त्यांच्या नावाचा विसर भाजपला पडला आहे. त्याचवेळी केवळ कसबा पेठ मतदारसंघाचे राजकारण करणाऱ्या आणि घर सोडावे लागते म्हणून पक्षाची कोणतीही जबाबदारी न घेणाऱ्या रामभाऊ माळगी यांच्या नावाने मात्र पंचतारांकित संस्था उभा केल्या आहेत. जे पक्ष वाढीसाठी झटले त्यांना बाजूला करण्यात आले पण उपेक्षित ठेवले,"असे गोटे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com