भाजपचा नगरसेवक दोन वर्षांसाठी तडीपार  - BJP corporator Sunil Kamathi deported for two years | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचा नगरसेवक दोन वर्षांसाठी तडीपार 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

अवैधरित्या मटका व्यवसायप्रकरणी पोलिसांनी शंभरहून अधिकजणांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यातील नगरसेवक कामठेसह पाच जणांना हद्दपार केले आहेत.

सोलापूर : जिल्ह्यातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीसांनी चांगली कंबर कसली आहे. मटका प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप नगरसेवक सुनिल कामाठी यांच्यासह पाच जणांना सोलापूर शहर, जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
 
याबाबतचा आदेश सोलापुरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढला आहे. भाजपा नगरसेवक सुनिल कामठी यांच्यावर सोलापुरात मटका चालवत असल्याचा आरोप आहे. कामाठी सध्या या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. 

अवैधरित्या मटका व्यवसायप्रकरणी पोलिसांनी शंभरहून अधिकजणांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यातील नगरसेवक कामठेसह पाच जणांना हद्दपार केले आहेत. तर अनेक जणांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई केली आहे. 

सोलापूर-जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा सुरूच 

जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपशाला बंदी असतानाही, वाळू माफियांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमामात धोका निर्माण झाला आहे. 

बेकायदेशीर वाळू उपशाला परवानगी नसताना ही वाळू माफिया कोणत्या ना कोणत्या मार्गाने वाळू उपसतचं आहेत, बार्शी तालुक्यातील राळेरासच्या नदीवर मोठ्या प्रमाणात वाळू उपसण्याचे काम सुरू आहे.

याकडे मात्र, प्रशासनानेचे दुर्लश झाले आहे. वाळू उपसा करण्यासाठी नव-नवीन मार्ग अवलंबले जात आहेत. कुणालाही शंका येऊ नये, म्हणून नदी पात्रातील वाळू बैलगाडी आणि गोण्यांमधून पसार केली जात असल्याच चित्र पहायला मिळतं आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख