रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांना मोठा धक्का...प्रस्थापितांना डावलून नव्या चेहऱ्याना संधी - Big shock to the supporters of Raosaheb Danve ... Opportunity for a new face by beating the established ones | Politics Marathi News - Sarkarnama

रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांना मोठा धक्का...प्रस्थापितांना डावलून नव्या चेहऱ्याना संधी

लक्षण सोळुंके 
सोमवार, 18 जानेवारी 2021

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन विधान सभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निकालात दानवे यांना मोठा धक्का बसला आहे.

जालना :  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकरदन विधान सभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निकालात दानवे यांना मोठा धक्का बसला आहे. 

भोकरदन तालुक्यातील प्रस्थापित ग्रामपंचयातीत दानवे यांच्या समर्थकांनी मोठा धक्का बसला आहे. 12 फेऱ्या अंती जवळपास  ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहे, यांत पारध, वाळसावनगी ,सिपोरा बाजर, केदारखेडा, जळगाव सपकाळ, आव्हान, या मोठ्या ग्रामपचायतीत दानवे यांच्या समर्थकांना डावलून जनतेने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे आपल्या बालेकिल्ल्यातच दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

शिवसेनेने दिला चंद्रकात पाटलांना धक्का 
 
कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेने गावातील 6 जागांवर विजय मिळवला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  

पाटील यांच्या खानापूर गावामध्ये भाजपने-काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती. शिवसेनेला शह देण्यासाठी स्थानिक नेते एकत्र आले होते. मात्र, तरीही शिवसेने 6 जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून आणली आहे. कोल्हापुरातील खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची राज्यभर चर्चा सुरु झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खानापूरच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी खानापूरमध्ये विजय खेचून आणला आहे.  

पाटोदा ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल....

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा या आदर्श ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला आहे.गेली पंचवीस वर्ष पाटोदा ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असलेले माजी सरपंच व पाटोदा गावच्या विकासाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर पेरे पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती.

नव्या लोकांना संधी मिळावी म्हणून आपण निवडणूक लढवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. असे असले तरी त्यांची मुलगी अनुराधा पेरे पाटील ही निवडणुकीत उभी होती. परंतु तीन जागांसाठी मतदान झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आला तेव्हा अनुराधा पाटील या पराभूत झाल्याचा समोर आले आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या उमेदवाराला २०८ मते मिळाली तर अनुराधा पेरे पाटील यांना १८३ मते मिळाली आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख