आमदार सुरेश धस यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश 

या प्रकरणी आमदार धस यांच्यावर आष्टी पोलिसांत जिल्हाबंदीचा भंग केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून नुकतेच त्यांना आष्टी न्यायालयात हजर राहण्याचे वॅरंट बजावण्यात आले आहे.
suresh dhas.jpg
suresh dhas.jpg

आष्टी : भिगवण व खेड परिसरातून ऊसतोडणी मजुरांची सुटका केल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्यावर दाखल झालेल्या जिल्हाबंदीच्या गुह्यात धस यांना वॅरंट बजावण्यात आले असून गुरुवारी (ता. 22) धस यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 24 मार्च पासून सर्वत्र लॉकडाऊन घोषित होऊन संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र, साखर कारखान्यांचा हंगाम संपल्याने गावी निघालेल्या आष्टी, पाटोदा, नवगण राजुरी व बीड येथील मजुरांना ता. एक एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी भिगवण व खेड येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी अडविले. विनंत्या करूनही पोलिसांनी या मजुरांना सोडले नाही. या मजुरांचे खाण्यापिण्याचे हाल झाल्याने मजुरांनी आपबिती आमदार सुरेश धस यांना फोनद्वारे सांगितल्याने त्यांनी रात्री या तपासणी नाक्यावर जाऊन मजुरांची खाण्यापिण्याची व्यवस्था करून संबंधित साखर कारखाना प्रशासनास जाब विचारून ऊसतोड मजुरांना गावाकडे मार्गस्थ केले होते.


या प्रकरणी आमदार धस यांच्यावर आष्टी पोलिसांत जिल्हाबंदीचा भंग केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून नुकतेच त्यांना आष्टी न्यायालयात हजर राहण्याचे वॅरंट बजावण्यात आले आहे. सध्या राज्यातील ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतुकदारांनी संप पुकारला असून आमदार धस हे ऊसतोड मजूर जनजागृतीसाठी राज्यभर फिरत आहेत. हा दौरा सुरू असताना न्यायालयाने वॅरंट बजावल्याने धस यांना दौरा सोडून ता. 22 रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

ही पण बातमी वाचा : वैद्यनाथ बॅंकेच्या अध्यक्षाला दहा लाखाची लाच घेतल्याने अटक

बीड : बँकेच्या व्यापारी सभासदाला अडीच कोटी रुपयांचे सीसी (कॅश क्रेडीट) कर्ज मंजूर केल्यावरुन १५ लाख रुपयांची मागणी करुन दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष अशोक जैन यास सोमवारी (ता. १९) परळी येथील राहत्या घरी अटक करण्यात आली.

औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. जिल्ह्यातील प्रमुख नागरी सहकारी बँकांपैकी परळी येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँक ओळखली जाते. या बँकेच्या एका कळंब येथील सभासद व्यापाऱ्याला २०१८ मध्ये अडीच कोटी रुपयांचे कॅश क्रेडीट कर्ज मंजूर करण्यात आले. यासाठी बँकेचा अध्यक्ष अशोक पन्नालाल जैन याने 15 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. ता. २९ सप्टेंबरला लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीची औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पडताळणी केली. त्यातील दहा लाख रुपये सोमवारी व नंतर उर्वरित पाच लाच रुपये स्विकारण्याचे ठरले. त्यावरुन पथकाने सोमवारी अशोक जैन याच्या राहत्या घरी सापळा रचला. तक्रारदाराकडून दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना अशोक जैन यास रंगेहाथ पकडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com