अन् जयंत पाटलांनी मध्यरात्री स्टेअरिंग घेतले हाती! - Anjayant Patil takes the steering wheel in the middle of the night! | Politics Marathi News - Sarkarnama

अन् जयंत पाटलांनी मध्यरात्री स्टेअरिंग घेतले हाती!

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

स्वतः गाडी चालवत बाहेर पडले. स्टेअरिंग हातात धरलेल्या जयंत पाटलांच्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

यवतमाळ : राष्ट्रवादी  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्यावर आहेत. दिवसभर कार्यकर्त्यांचा गराडा बैठका, भेटीगाडी यामधून वेळ काढून पाटील यांनी मध्यरात्री युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं म्हणून स्वतः गाडी चालवत बाहेर पडले. स्टेअरिंग हातात धरलेल्या जयंत पाटलांच्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात सोबत असलेल्या युवा पदाधिकाऱ्यांशी बोलता यावं, त्यांना मार्गदर्शन करता यावं, म्हणून जयंत पाटील मध्यरात्री पुन्हा बाहेर पडले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राष्ट्रवादी परिवार संवाद अभियानानिमित्ताने दौर्‍यावर आहेत.

युवा पदाधिकारी दिवसभर सोबत असले तरी त्यांच्याशी पक्षाच्या बांधणीबाबत नीट चर्चा करता येत नाही, यामुळे जयंत पाटील यांनी शुक्रवारी मध्यरात्री 1 ते पहाटे 3.17 वाजेपर्यंत जवळपास अडीच तास स्वतः ड्रायव्हिंग करत चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वागणुकीने युवा टीम चांगलीच प्रभावित झाली. त्यांची पाटील यांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा (ता. २८ जावेवारी) रोजी सुरु झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वात गडचिरोली जिल्ह्यातून या यात्रेची सुरुवात झाली. 'पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, पक्ष संघटनेला बळकटी देणे' याच उद्देशानं परिवार संवाद यात्रा सुरु करत असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. या परिवार संवाद यात्रेदरम्यान इतर पक्षातील काही कार्यकर्ते आणि नेते पक्ष प्रवेश करणार, असंही जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख