आंबेडकरांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले, 'मोदी दारूडे असून देश विकत आहेत' 

कोरोना विषाणूमुळे अडचणीत सापडल्याचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळे विकल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला.
Ambedkar's tongue slipped again; "Modi is an alcoholic and the country is selling," he said
Ambedkar's tongue slipped again; "Modi is an alcoholic and the country is selling," he said

सोलापूर : कोरोना विषाणूमुळे अडचणीत सापडल्याचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळे विकल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला.

"दारूड्या हा जवळचे सगळे संपले की घर विकायला काढतो, तसाच प्रकार मोदींकडून सुरू आहे. ते पंतप्रधान नसून दारूडे आहेत,' असे वादग्रस्त वक्‍तव्य ऍड. आंबेडकरांनी पंतप्रधानांवर टीका करताना केले. 

अक्‍कलकोट तालुक्‍यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी ऍड. आंबेडकर यांनी आज (ता. 20 ऑक्‍टोबर) केली. त्यानंतर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीची मदत करण्याची मागणी केली.

नुकसानग्रस्तांना खावटी योजनेतून प्रत्येकी पाच हजारांची मदत द्यावी, मुख्यमंत्र्यांनी ठराविक जिल्ह्यातील काही भागांचीच पाहणी करण्यापेक्षा सर्वच नुकसानग्रस्त भागांचा दौरा करावा. जेणेकरुन त्यांना दिलासा मिळेल आणि सरकार आपल्या पाठिशी असल्याचा विश्‍वास निर्माण होईल. तसेच, पुराच्या पाण्याने धान्य, कपडे खराब झाल्याने त्यांना अनुदानाच्या स्वरुपात धान्य, भांडी, कपड्यांचीही मदत करावी, अशीही आपली मागणी असल्याचे ऍड. आंबेडकरांनी सांगितले. 


फडणवीसांनी जमिनीवर यावे 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता गेल्याचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांनी आता तर जमिनीवर येऊन विरोधकाची भूमिका बजावावी, असा सल्ला ऍड. प्रकाश आंबेडकरांनी दिला. अर्थमंत्र्यांनी कोणते तरी कारण पुढे करून कारखानदारांना मदत द्यायची आणि नुकसानग्रस्तांना मदत न देण्याची भूमिका बदलावी, असा टोलाही लगावला.

साखर कारखानदारांना थकहमी देण्यासाठी तीन पायांच्या सरकारमधील दोन पाय एका पायावर दबाव टाकत आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केला. दरम्यान, उसतोड कामगारांसोबतचा करार संपला असून आता नवा करार करण्याच्या निमित्ताने 25 ऑक्‍टोबरला विशेष परिषद आयोजित केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

महाविकास आघाडीने सावध व्हावे 

केंद्र सरकार ज्या दिशेने विचार करते, त्याच दिशेने जाणे प्रत्येक राज्याचे कर्तव्य आहे. केंद्राच्या भूमिकेला विरोध कोणतेही राज्य सरकार करु शकत नाही. केंद्र सरकारच्या ध्येय धोरणास विरोध करणाऱ्या राज्याविरुद्ध 356 कलमाचा वापर करुन ते सरकार बरखास्त करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचा इशारा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सावध व्हायला हवे, असा इशाराही आंबेडकर यांनी या वेळी दिला. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com