सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अंदाजे ९३५ कोटी रुपयांचे नुकसान :पालकमंञी - 950 crore loss due to heavy rains in Solapur district | Politics Marathi News - Sarkarnama

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अंदाजे ९३५ कोटी रुपयांचे नुकसान :पालकमंञी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ९३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ९३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झाले असून शासनाकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, असेही त्यांनी आज सांगितले. 

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी  आज बैठक घेतली. जिल्हाधिकारी बहुउद्देशिय सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

भरणे यांनी सांगितले की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शेती, रस्ते, पाणीपुरवठा योजना, जलसंपदा विभागाकडील नुकसान यांची एकत्रित माहिती घेतली असता हे नुकसान सुमारे 935 कोटी 28 लाख रुपयांचे असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. याबाबत सर्वांकश अहवाल शासनास पाठविण्यात आला असून जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहील.

मास्क वापरला नाही तर नागरिकांना 500 रुपयांचा दंड करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. ही मोहीम प्रभावीपणे राबावावी जेणेकरुन नागरिकांच्यात मास्क वापरण्याबाबत जागृती होईल, अशा सूचना भरणे यांनी दिल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख