We will not contest the next elections if Gokul Dudh Sangh is not well managed: Hasan Mushrif
We will not contest the next elections if Gokul Dudh Sangh is not well managed: Hasan Mushrif

....तर पुढची निवडणूक आम्ही लढवणार नाही : हसन मुश्रीफ

गोकुळ दूध संघाचा अमूलपेक्षा चांगला ब्रॅंड करू.

कोल्हापूर : गोकुळची आमच्याकडे कधीच सत्ता नव्हती. आम्ही इतर संस्थांचा कारभार उत्तम केला आहे. एकदा गोकुळची सत्ताही सभासदांनी आमच्या हाती द्यावी. जर पाच वर्षात उत्तम पद्धतीने कारभार करुन दाखवला नाहीतर पाच वर्षांनी गोकुळची निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. तर, ‘दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठीच गोकुळच्या मैदानात उतरलो आहोत. गोकुळ दूध संघाचा अमूलपेक्षा चांगला ब्रॅंड करू, असा विश्‍वास व्यक्‍त करत संघाची सत्ता देण्यासाठी सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

गोकुळच्या निवडणुकीसाठी मंगळवारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने (विरोध) पॅनेलची घोषणा केली. या वेळी अजिंक्‍यतारा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस मुश्रीफ, पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, चंद्रदीप नरके, ए. वाय. पाटील यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते.

मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील चांगला संघ आहे. त्याला आणखी चांगले करण्याची संधी सभासदांनी आम्हाला द्यावी. संघाची सत्ता आमच्याकडे कधी आलेली नाही. जिल्हा बॅंकेला मागील पाच वर्षात आम्ही देशात अव्वल स्थानी नेले आहे. अशाच पद्धतीने गोकुळला देखील अव्वल स्थानी व अमूलच्या तोडीस तोड नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. एकदा गोकुळची सत्ता सभासदांनी आमच्या हाती द्यावी, विकास कसा करायचा असतो, हे आम्ही त्यावेळी दाखवून देवू, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. देशभरातील चांगल्या दूध संघांचा अभ्यास करुन दुधाला 2 रुपये जादा दर देणे शक्‍य असल्याचे आमदार विनय कोरे यांनी या वेळी सांगितले.

 
वासाच्या दुधाच्या नावाखाली लूट 

सध्या गोकुळ दूध संघात वासाच्या दुधाच्या नावाखाली दूध उत्पादकाची लूट होत आहे. कवडीमोल किंमतीला त्याची खरेदी होत आहे. असे प्रकार सत्ता बदलल्यानंतर बंद केले जातील. वासाचे दूध एकतर उत्पादकाला परत केले जाईल किंवा त्याला योग्य मोबदला देवून त्याचे नुकसान टाळले जाईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच उत्पादकाला किमान 2 रुपये लिटरला भाववाढही देण्याची घोषणा मुश्रीफ यांनी केली.
 
...तर कर्नाटकातील हजारो सभासद झाले असते

विद्यमान सत्ताधाऱ्यांनी संघ मल्टीस्टेट करुन घशात घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, दूध उत्पादकांनी त्याला विरोध केला. जर संघ मल्टीस्टेट झाला असता तर कर्नाटकातील हजारो सभासद झाले असते. त्यामुळे निवडणुकाही झाल्या नसत्या. सभासदांनी मल्टीस्टेटला विरोध केल्यानेच आज हा दिवस आला आहे. संघाची क्षमता वाढवताना तो मल्टीस्टेट असण्याची गरज नाही. आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून दूध खरेदी आणि विक्री करु शकतो, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

गोकुळची सत्ता दिल्यास लिटरला किमान 2 ते 4 रुपये जादा दर देण्याचा आमचा निर्धार आहे. चांगल्या पशुखाद्याचा पुरवठा, जिल्ह्यासह राज्यातील दूध संकलन वाढवण्याचा आमचा संकल्प आहे. तसेच दुधाची दरवाढ करताना याचा ग्राहकावर भुर्दंड बसणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. 
-सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com