कोल्हापूर : कौमार्य चाचणीत Virginity Test अपशयी ठरल्याचे कारण सांगून कोल्हापुरातील Kolhapur सख्या बहिणांनी बेळगावातून येथे पाठवून काडीमोड केल्या प्रकरणी राजारामपुरी पोलिस Police ठाण्यात गुन्हा नोंद झाला. विवाहानंतर अवघ्या तीन दिवसातच बहिणींना कोल्हापूरला परत पाठविण्यात आले होते. Virginity Test Done in Kolhapur Officen registered
याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने हे कृत्य करणाऱ्या सख्ख्या भावांसह विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केल्यानंतर संबधितांवर राजारामपुरी पोलिसात Police गुन्हा दाखल झाला.दरम्यान, या प्रकरणी फिर्यादीचे पती संदीप सनी कंजारभाट, बहिणीचे पती सूरजीत सनी कंजारभाट, सासू शोभा सनी कंजारभाट (हनुमाननगर, बेळगाव), ईश्वर गागडे (इचलकरंजी), डमी नवरा अमरदीप ऊर्फ लाला गागडे (राजेंद्रनगर), दिलीप माटुंगे, विजय माटुंगे, सुदेश माटुंगे व इतर जात पंचायतीच्या लोकांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक सिताराम डुबल, मुलींचे नातेवाईक, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापुरातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह २७ नोव्हेंबर २०२० ला बेळगाव मध्ये झाला होता. संदीप सनी कंजारभाट व सुरजीत सनी कंजारभाट (रा. हनुमाननगर, बेळगाव) या सख्या भावांसोबत विवाह झाल्यानंतर त्यांच्या समाजातील परंपरेनुसार कौमार्य चाचणी Virginity Test घेण्यात आली. तीत एक मुलगी अयशस्वी ठरल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. Virginity Test Done in Kolhapur Officen registered
यातून पतीने मुलींच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचे शारिरीक आणि मानसिक छळ सुरू केला. लग्नानंतर तीन दिवसांनी सासरच्या मंडळींनी घरातून माहेरी पाठवले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आणि समाजातील काहींनी त्यांचा संसार पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये अपेक्षीत यश येत नव्हेत. दरम्यानच्य काळात सासरकडून घर बांधकामासाठी दहा लाखांची मागणी झाली. पैसे देणे शक्य नसल्यामुळे कोल्हापुरात पुन्हा जात पंचायत बसविण्यात आली. येथे दोन्ही मुलींचा काडीमोड झाल्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जात पंचायतीच्या पंचांनी चाळीस हजार रूपये घेतले. त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करण्यासाठी आग्रह धरला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील, गीता हसुरकर, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे यांनी आज दुपारी राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्याशी चर्चा केली. तसेच या प्रकरणी संदीप व सुरजीत या सख्ख्या भावांसह त्यांची आई शोभा, मामा ईश्वर गागडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या आग्रह धरला. त्यानुसार रात्री त्यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केल्याचे निरीक्षक डुबल यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

