संभाजीराजे यांच्याशी उदयनराजे यांचे मतभेद आहेत काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज (रविवार) साता-यातील जलमंदिर पॅलेसच्या प्रांगणात उदयनराजे भोसले (Udayan Raje) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
 Udayan Raje, Sambhaji Raje .jpg
Udayan Raje, Sambhaji Raje .jpg

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज (रविवार) साता-यातील जलमंदिर पॅलेसच्या प्रांगणात उदयनराजे भोसले (Udayan Raje) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. उदयनराजे म्हणाले त्याकाळी इतरांनी स्वतःला राजा म्हणून मिरवले परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःला राजा म्हणून मिरवले नाही. यामुळेच त्यांची रयतेचा राजा म्हणून ख्याती आहे. स्वराज्याचा विचार मार्गी लावला. स्वराज्याच्या संकल्पना त्यावेळेचे जे रयतेचे राज्य होते ते आत्ता गेले कोठे आणि का असा प्रश्न उदयनराजेंनी केला. (Udayan Raje said about Sambhaji Raje)

त्याकाळी लोक बंधूभावाने राहत होते. आता त्यांच्यात दरार का पडली. हे विचार केवळ माझ्या मनात येत नाही सर्वांच्या मनात येते. मन अत्यंत दुखी झालेले आहे. शिवाजी महाराज प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जो येतो त्याला एक ना एक दिवस जावे लागते. श्वास कधी थांबेल याची श्वाश्वती देता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अभिप्रेत असलेली ही लोकशाही नाही. या देशाचे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही. कूठे तरी दूरावलेले जाणवते. ही जबाबदारी केवळ माझी नाही. लोकशाहीतील सर्वांत मोठा स्तंभ मीडिया. सर्वांनी एकत्रित यावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर संभाजीराजे (Sambhaji Raje) सर्वांची भेट घेत आहेत. परंतु तुमची भेट त्यांनी घेतलेली नाही. तुमच्यात आणि त्यांच्या वैचारिक मतभेद आहेत का या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले ते माझे धाकटे भाऊ आहेत. कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत. त्यांच्याबराबरच सर्वांवर म्हणजेच रयतेवर माझे प्रेम आहे. भेदभाव असण्याचे काही कारणच नाही. मराठा आरक्षणावर पुन्हा16 जूनला आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले दुर्देवी गोष्ट आहे आंदोलन करण्याची वेळ येत आहे. 

कोणत्याही परिस्थितीत सर्वांना एकत्र घेऊन राज्य कारभार चालला पाहिजे असे मी नेहमी सांगत असतो. मग सत्ता कोणाचीही असो. कोणाचेही आरक्षण काढून अन्य कोणाला देऊ नका. मराठा समाजावर भेदभाव करु नका. त्यांचा देखील अधिकार आहे त्यावर. गायकवाड आयोगाने सविस्तर दिले असताना ते का टाळले जात आहे. त्याचे व्यवस्थित वाचन झाल नाही. झाल असते तर सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने नकारात्मक निकाल दिला नसता. तुम्हांला जर क्रेडिट घ्यायचे असेल तर चांगल्या कामाचे घ्या असा टोला उदयनराजेंनी राज्य सरकारला लगावला.

 दोन दिवसांपुर्वी भोसले आयोगाचा अहवाल सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर काय भूमिका घेते बघू असेही उदयनराजेंनी नमूद केले. एखादा अहवाल स्विकारल्यानंतर तो पुन्हा न्यायालयात पाठविण्याची आवश्यकता नव्हती. ईडब्यूलएस हे केंद्र शासनाने लागू केले आहे. जाती धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम कोणी करु नका. जे तुम्ही करीत आहात त्याची श्वेतपत्रिका काढा. आता कोणीही राजकारण करु नका. लोकांना न्याय हवाय. न्याय देण्याच्या काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली तसे त्यांचे विचार आचारणात आणा. तुमच्या अंतकरणात शिवाजी महाराज असतील तर त्यांचे विचार आचारणात आणण्याचे काम तरी करा हीच शिवरायांना भेट दिल्याचे ठरेल. 

माध्यांम समोर आल्यावर एक बोलायचे आणि करायचे दूसरे हे योग्य नाही. समाजाचे डोळे तुमच्याकडे लागून राहिले आहेत. तुम्ही कसे वागता आणि काय करता. यामध्ये कोणाचीही सुटका नाही. जर उद्रेक झाला तर केवळ राज्यकर्ते जबाबदार असतील. कारण नसताना टोलवा टोलवी करुन पक्ष कोणताही असो. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेच पाहिजे. अधिवेशन बोलवा अशी मागणीही उदयनराजेंनी केली. लोकांना कळू द्या आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय काम करीत आहेत.

मराठा आरक्षणाचे नेतृत्व तुम्ही करावे?

मी कोण ठरविणार. आता लोकच ठरविणार आहेत. एक सांगतो तुम्ही लोकांना व्यवस्थित ठेवण्याचे काम केले नाही तर वेगवेगळ्या जाती तेढ निर्माण झाल्यास उद्रेक होईल. दिशाभूल करण्याचे काम करु नका. ज्या दिवशी लोकांना कळेल त्यावेळी ती तुम्हांला सोडणार नाहीत. ज्या पद्धतीने मांडणी करण्यात आली तीच चुकीचे करण्यात आल्याचे उदयनराजेंनी राज्य सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी स्पष्टीकरण देऊत मग मी भूमिका मांडतो. कधी करणार ते सगळे गेल्यानंतर का. मी कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. भेदभाव करीत नाही. जात मानत नाही. लवकरात लवकर श्वेतपत्रिका जाहीर झाली पाहिजे अशी मागणी उदयनराजेंनी केली. 

युवा वर्ग आत्महत्या करीत आहेत

आज समाजातील युवक आत्महत्या करीत आहेत. हे वाईट आहे. काही दिवसांपुर्वी मी एका युवकाच्या वडिलांशी बोललो ते म्हणाले मी मूलास शिक्षण दिले, मोठे होण्यासाठी सगळे केले पण काय घडले आज माझ्या हातातून त्याला अग्नी द्यावा लागला. हे किती दुखद आहे तुम्हीच बघा असेही उदयनराजेंनी नमूद केले. 

आर्थिकदृष्ट्या मागास 

मराठा समाजात अनेक मंत्री आहेत खासदार आहेत. त्यांना कशा हवे आरक्षण असेही बोलले जाते असे सांगून उदयनराजे म्हणाले किती लोक असतील असे पाच टक्के. जे लोक सधन आहेत त्यांनी लागू करु नका असे माझे तर म्हणणे आहे. सर्व जाती धर्मात आर्थिक सक्षम असलेल्या लोकांना लागू करु नका. त्या त्या जातीमधील आर्थित कमकुवत असलेल्यांना लोकांना लागू करा. 
Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com