विरोधक लक्ष्मीदर्शन करतील. ती लक्ष्मी आपलीच असल्याने घ्या  : मुश्रीफांचे गोकुळच्या निवडणुकीत वाद्‌ग्रस्त विधान

तर मग निवडणुकीची भीती तुम्हाला का वाटते?.
Transform power in Gokul Dudh Sangh: Hasan Mushrif's appeal
Transform power in Gokul Dudh Sangh: Hasan Mushrif's appeal

कागल : मी गोकुळच्या सर्व सभासदांना फोन करून पॅनेल विजयी करण्याची विनंती करत आहे. गोकुळचे बहुसंख्य ठरावधारक मला सांगतात की, तुम्ही आमची कामे केली आहेत. कुठल्या गावचा, कुठल्या गटाचा जाती-धर्माचा विचार न करता तुम्ही कामे केली आहेत. तुम्हाला मतदान करण्याची संधी आतापर्यंत आम्हाला मिळाली नव्हती, ती गोकुळमुळे मिळाली आहे. आम्ही तुम्हाला मतदान करणार. माझी कळकळीची हात जोडून विनंती की, तुम्ही सर्व पॅनेलला मतदान करा. विकासाने तुमच्या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकू. विरोधी पॅनेलचे लोक गोकुळच्या निवडणुकीत लक्ष्मी दर्शन करतील. ती लक्ष्मी आपलीच आहे, त्यामुळे ती घ्या, परंतु परिवर्तन करा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.   

कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचारात मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले की, सत्ताधारी 3, 13 आणि 23 तारखेला दूध बिले देत असल्याचे सांगत आहेत. गवळीसुद्धा दहा दिवस झाले की बिल देतो. यामध्ये तुम्ही नवीन काय केलं? तुमचा कारभार जर एवढा चोख आणि दूध उत्पादकांच्या हिताचा असेल तर मग निवडणुकीची भीती तुम्हाला का वाटते?.

गोकुळची सत्ता आपण दिली, तर आम्ही वचन दिले आहे. गोकुळ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा करू. मल्टीस्टेट करण्यापासून आपण सर्वांनी संघर्ष करत खासगी होण्यापासून वाचविला आहे. हा संघर्ष वाया जाता कामा नये. आता पुढची लढाई आहे, सत्ता द्या, परिवर्तन करा.

दुधाला लिटरमागे दोन रुपये दरवाढ देऊ. पारदर्शी, चोख कारभार करू. पशुखाद्य व पशु वैद्यकीय सेवा यामध्ये वाढ करू. हे सर्व जर आम्ही केले नाही तर पाच वर्षांनी आम्हाला दारामध्ये उभे करून घेऊ नका. सत्ताधारी गोकुळ कसा चालवला हे सांगत आहेत, ते किती खोटं बोलत आहेत. आम्हाला सत्ता देऊन बघा, दूध उत्पादक महिलांना पाच वर्ष दीपावली व भाऊबीज अशी देऊ की, भाऊराया कसे असावेत, तर हसन मुश्रीफ, बंटी पाटील यांच्यासारखे असावेत, असे वाटले पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले.

गेली 25 ते 30 वर्षे सातत्याने गोकुळबाबत टिका व चर्चा असते. ती म्हणजे उधळपट्टी आणि प्रचंड खर्चाची. वासाचे दुध काढणे, दुधाची योग्य किंमत न देणे, मोठ्या लोकांच्याच टँकरना पाळी देणे, नोकऱ्यांमधील वरकमाई, मुंबई व पुण्याच्या दुध विक्री एजंटकडून वरकमाई घेतात, अशा अनेक तक्रारी आहेत. आता हे सगळ बंद करूया. शपथ घेवूया व परिवर्तन करूया, असा विश्वासही मुश्रीफ यांनी या वेळी व्यक्त केला.

पी. एन. साहेब...दुर्दैवाने, माझं खर ठरलं

मुश्रीफ म्हणाले, ‘‘गोकुळची निवडणूक महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र लढवावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे  पी. एन.  पाटील यांच्या बरोबर चर्चाही सुरू होती. त्या चर्चेमध्ये पी. एन. साहेबांना म्हणालो होतो, सत्तारूढ गटातील पॅनेलमध्ये तुमचा वरचष्मा राहणार नाही. यावर पी. एन. साहेब यांनी अतिशय आत्मविश्वासाने ‘आपण सांगेल तेच होईल’, असे सांगितले होते. पॅनेल जाहीर झाल्यानंतर पी. एन. साहेब या पॅनेल रचनेमध्ये तुमचा वरचष्मा राहिला नाही. दुर्दैवाने, माझं खर ठरलं!’’ 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com