सतेज पाटील शिळ्या कढीला ऊत आणून ‘गोकुळ’च्या सभासदांची दिशाभूल करीत आहेत

ज्यांच्या संस्था मल्टिस्टेट आहेत, तेच ’गोकुळ'च्या विरोधात बोलत आहेत.
Those whose institutions are multistate have no right to talk about 'Gokul': Ravindra Apte
Those whose institutions are multistate have no right to talk about 'Gokul': Ravindra Apte

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याचा विषय संघाचे नेते आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी यापूर्वीच वार्षिक सर्वसाधारण सभेत संपवला आहे; परंतु कालबाह्य झालेला विषय पुन्हा उकरून पालकमंत्री सतेज पाटील हे शिळ्या कढीला ऊत देत ‘गोकुळ'च्या सभासदांची दिशाभूल करीत आहेत, या शब्दांत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ'चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी प्रत्युत्तर दिले. 

‘गोकुळ' निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. 14 एप्रिल) कोल्हापूर दक्षिणमधील ठरावधारकांचा मेळावा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाला. मेळाव्यात  पाटील यांनी ‘गोकुळ' मल्टिस्टेटवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याला अध्यक्ष आपटे यांनी आज पत्रक काढून प्रत्युत्तर दिले. 

‘गोकुळ'मध्ये सभासदांच्या अडचणींचा जो विषय असेल तो घेणार नाही व यापूर्वीही घेतलेला नाही. ज्यांनी मल्टिस्टेटचा विषय सर्वसाधारण सभेत घेतला ते स्वतः त्यांच्यासोबत आहेत. ‘गोकुळ' हा शेतकऱ्यांच्या मालकीचा असून, शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातात. शेतकऱ्यांना आणखी जादा दर देता यावा, यासाठीच संघ मल्टिस्टेट करण्याचा मुद्दा पुढे आला होता, आता तो मागे पडला आहे. विरोधक शिळ्या कढीला ऊत आणत आहेत, सभासदांनी त्यांची वक्‍तव्ये गांभीर्याने घेऊ नयेत, असे आवाहनही आपटे यांनी पत्रकात केले आहे. 

ज्यांच्या संस्था मल्टिस्टेट आहेत, तेच ’गोकुळ'च्या विरोधात बोलत आहेत, असा आरोपही पत्रकात केला आहे. मंडलिक कारखाना मल्टिस्टेट, वारणा दूध संघ मल्टिस्टेट, संताजी घोरपडे खासगी,  बंद पडलेला महालक्ष्मी दूध संघ मल्टिस्टेट होता. या संस्था ज्या नेत्यांच्या आहेत किंवा होत्या, त्या नेत्यांना ‘गोकुळ'वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे टोलाही आपटे यांनी पत्रकाच्या माध्यमातून विरोधकांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com