सांगोल्यात शेकापला मोठा धक्का... 

राज्यात महाविका आघाडी सत्तेत आल्यापासून राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे.
 NCP, Sharad Pawar, Ajit Pawar .jpg
NCP, Sharad Pawar, Ajit Pawar .jpg

सोलापूर : राज्यात महाविका आघाडी सत्तेत आल्यापासून राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रात एकमेव सांगोला तालुक्यात अस्थित्वात असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. (Shetkari Kamgar Party corporators join NCP)

यामध्ये सांगोला तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक मधुकर बनसोडे, माजी नगरसेवक शिवाजी नाना बनकर, नगरसेवक विजय राऊत, माळी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ राऊत, विद्यमान नगरसेविका रंजना बनसोडे, ॲड. सोमनाथ नवले, ॲड. विक्रांत बनकर, इंजि. किशोर गोडसे, नितीन वसेकर, संजय गार्डे यांनी राष्ट्रावादीमध्ये प्रवेश केला.

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील उपस्थित होते. 

दरम्या, सोलापूर महापालिका निवडणुकीत महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी आतापासून तयारीला लागा, याकामी आपल्या विचाराने चालणाऱ्या महेश कोठे यांची मदत घ्या असे आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शहर पदाधिकारी व नेत्यांना दिले. या बैठकीत पालकमंत्री बदलाचा विषयच निघाला नसल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने पालकमंत्री बदलाच्या विषयाला पूर्णविराम मिळाल्याचे संकेत आहेत.

मंगळवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक झाली. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, विद्या लोलगे तसेच सध्या शिवसेनेत पण राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले नगरसवेक महेश कोठे उपस्थित होते.

या बैठकीत केवळ पक्षाबाबतच चर्चा झाली. आगामी निवडणुकीत सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी आतापासून तयारी, व्यूहरचना करा. याकामी आपल्या विचाराने चालणाऱ्या महेश कोठे यांची मदत घ्या, पालकमंत्र्यांनीदेखील स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन महापालिकेवर सत्ता आणण्याची जबाबदारी घ्यावी, असे आदेश शरद पवार यांनी दिल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com