शौमिका महाडिकांच्या उमेदवारीचा निर्णय महादेवराव महाडिकांनी नव्हे; तर आम्ही सर्वांनी घेतला 

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतो.
Shaumika Mahadik's candidature has been decided by all of we together: MLA P.N. Patil
Shaumika Mahadik's candidature has been decided by all of we together: MLA P.N. Patil

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिलिटर दुधाला दहा रुपये देणारे आज दोन रुपयांवर आले आहेत, अशी टीका आमदार पी. एन. पाटील यांनी आज केली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी सत्तारुढ गटाच्या वतीने आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी राजर्षी शाहू आघाडी पॅनेलची घोषणा केली. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणतो. पण, विरोधक गोकुळ दूध संघ मोडून खातील, अशी कधीही टिका केली नसल्याचेही आमदार पाटील स्पष्ट केले.

दरम्यान, शौमिका महाडिक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महादेवराव महाडिक यांनी घेतलेला नाही, तर तो निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
 
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, गोकुळच्या दूध उत्पादकांना 82 ते 90 कोटींपर्यंत लाभांश देतो. मात्र, काही तरी काढून विरोधकांनी गेल्या सहा वर्षांपासून चुकीचे आंदोलन केले. विरोधकांनी गोकुळच्या वार्षिक सभेवेळी विरोधक प्रतिलिटर दुधाला 10 रुपये वाढ देण्याची घोषणा केले होती. आज ते दोन रुपयांवर आले आहेत.

सरकारचा जो महानंद दूध संघ आहे. तो गोकुळपेक्षा 5 रुपये कमी दराने दूध खरेदी करतात. तरीही गोकुळकडून खरेदी दरात कपात केलेली नाही. या वर्षी 98 कोटी रुपयांचा फरक शेतकऱ्यांना देणार आहे. देशात आणि राज्यात गोकुळ एवढा जास्त दर कोणीही देत नाही. या वेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ नेते अरुण नरके उपस्थित होते. 

 वासाचे दूध 

एखाद्याने खराब दूध संस्थेला दिले, तर तेच खराब दूध चांगले दूधही खराब करुन टाकते. याचे प्रमाणही आता खूप कमी आहे. विरोधक उगाच काही तरी मुद्दा काढायचा म्हणून काढत असल्याची टीकाही पाटील यांनी केली. 

लॉकडाऊनदरम्यान गोकुळ फार्मात  

लॉकडाऊनच्या काळात राज्यात कोठेही दूध सुरु नव्हते. मुंबई, पुणे, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कणकवलीला जाणारे सर्व दूध बंद होते. त्यानंतर दिवसाला सहा ते साडे सहा लाख लिटर दूधाची पावडर तयार केली. सध्या 300 कोटी रुपयांची पावडर विक्री केली आहे. लॉकडाऊननंतर गोकुळ पुन्हा फार्मात आहे. कारभारही चांगला सुरु आहे. संघाकडे सध्या 450 कोटींच्या ठेवी होत्या, यातून शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाची बिले दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. 

पंधरा रुपयाने दूध घ्या म्हणून मागे लागले होते  

लॉकडाऊनच्या काळात कर्नाटक, सांगली, गुजरातमधून प्रतिलिटर 15 रुपये दराने दूध खरेदी करा म्हणून लोक मागे लागले होते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना याचा फटका बसू नये यासाठी आम्ही बाहेरील राज्यातील आणि जिल्ह्यातील दूध खरेदी केले नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दूधाला चांगला फायदा झाला असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

तीस वर्ष लढतोय, आजही लढणार 

कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्र सरकारनेच सहकारी संस्थांच्या निवडणूका रद्द केल्या आहेत. पहिला निर्णय 31 मार्चपर्यंत सर्व निवडणूका ढकलण्याचा घेतला. त्यानंतर विरोधक न्यायालयात जावून सरकारच्या विरोधात जावून निवडणूकीची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने तारीख जाहीर करण्याआधीच सराकरने निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्याचा आधार घेवून पुन्हा निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यावेळी सरकारने निवडणूक घेण्यास सांगितले असताना तुम्ही का थांबवता आहेत, असेही कोर्टाने सांगितले होते. दरम्यान, गोकुळ संघ चांगला चालला असताना निवडणुकीची एवढी घाई का; म्हणून काही संस्था न्यायालयात गेल्या आहेत. आम्ही गेल्या तीस वर्षापासून लढतोय आणि आजही लढण्याची तयारी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

जिल्हा बॅंक चांगली चालली आहे 

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेचा कारभार चांगला सुरू आहे. प्रशासक असताना जो कारभार होता, त्यापेक्षाही सध्या बॅंकेचा चांगला कारभार होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com