शंभूराज देसाईंनी उडवली नारायण राणेंची खिल्ली 

महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉलंड यार्ड पोलिसांशी होते. महाराष्ट्र पोलिसांचा नावलैकीक जगाला माहिती आहे.
Shambhuraj Desai Narayan Rane .jpg
Shambhuraj Desai Narayan Rane .jpg

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नांव आता महाराष्ट्र विसरला आहे. ते ज्या पक्षात आहेत, त्यांच्याच पक्षात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांच्यावर बोलुन त्यांना अधिक महत्व देणे मला काय योग्य वाटत नाही, अशा शब्दात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राणे यांची खिल्ली उडवली.

कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. या प्रश्नावर मंत्री देसाई यांनी कुणी.. कुणी.. मागणी केली आहे ? अशी उलट विचारणा पत्रकारांना करुन ते म्हणाले, नारायण राणे यांचे नाव महाराष्ट्र विसरला आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांच्यावर बोलुन त्यांना अधिक महत्व देणे मला काय योग्य वाटत नाही, असे देसाई म्हणाले. 

महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉलंड यार्ड पोलिसांशी होते. महाराष्ट्र पोलिसांचा नावलैकीक जगाला माहिती आहे. सचिन वाझे यांच्या केसमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असताना त्यांच्यावर गैरविश्वास दाखवुन त्यात केंद्राने हस्तक्षेप करणे योग्य नाही, असे म्हणत केंद्राच्या हस्तक्षेपाबद्दल नाराजी व्यक्त केली.

देसाई म्हणाले, विधानसभेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व सदस्यांनी आग्रही मागणी केली, तेव्हा या तपास कामांमधून वाझे यांना बाजूला करून त्यांची इतरत्र बदली करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस योग्य दिशेने तपास करत असताना केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकार दोषी असणाऱ्या कुणालाही पाठिशी घालणार नाही. महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉलंड यार्ड पोलिसांशी होते. महाराष्ट्र पोलिसांचा नावलैकीक जगाला माहिती आहे. सचिन वाझे यांच्या केसमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असताना त्यांच्यावर गैरविश्वास दाखवुन त्यात केंद्राने हस्तक्षेप करणे योग्य नाही. 

काय म्हणाले होते नारायण राणे? 

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विधीमंडळ अधिवेशनादरम्यानही भाजप नेत्यांनी सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत वक्तव्य केले होते.  

देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी 

राणे म्हणाले, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. त्यामुळे मी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. सध्या मुंबई पोलिसांचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी केला जात आहे, अशी टीकाही राणे यांनी केली.

सचिन वाझे यांना झालेल्या अटकेविषयी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेचे अनेक नेते वाझेंच्या संपर्कात होते. वाझेंच्या जीवावर शिवसेनेच्या नेत्यांकडून धमक्या दिल्या गेल्या. सचिव वाझेंवर शिवसेनेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे वाझेंनी आतापर्यंत हाताळलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी व्हायला हवी. दिशा सालियन, सुशांतसिंह रजपुत यांच्या मृत्यूही चौकशी होण्याची गरज आहे, अशी मागणी राणे यांनी यावेळी केली. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com