केसरकरांनी सेना सोडली? की रजेवर गेले? मनसे पदाधिकाऱ्यांचा टोला

माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना सोडली की? ते मोठ्या रजेवर गेलेत? हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदार वैभव नाईक यांनी जाहीर करावे. आमदार किती दिवस आजारी आहेत, हे त्यांनी जनतेला पण सांगावे, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar

सावंतवाडी : माजी मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना सोडली की? ते मोठ्या रजेवर गेलेत? हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदार वैभव नाईक यांनी जाहीर करावे. आमदार किती दिवस आजारी आहेत, हे त्यांनी जनतेला पण सांगावे. यंदाचा गणपतीदेखील त्यांनी मुंबईत बसवल्यामुळे ते मतदारांना विसरले, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केली आहे.

सावंतवाडीचे प्रश्‍न सोडवण्यासाठी तसेच मतदारसंघातील समस्या ऐकून घेण्यासाठी आमदार नाईक हे सावंतवाडीत येत आहेत. त्यांनी जरूर यावे; पण त्यांनी अगोदर आपल्या मतदार संघात असलेले जिल्हा रुग्णालयातील प्रश्‍न आणि रूग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांचे होत असलेले हाल, रुग्णांना मिळत असलेले जेवण, अस्वच्छता, शेर्ले येथील तालुका कोविड सेंटरमध्ये साफ-सफाई न करणाऱ्या रुग्णांना त्रास देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई यांसारख्या प्रश्‍नांबाबत काय कारवाई करतील की, त्यांना पाठीशी घालतील? हे जाहीर करावे, अशीही मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली.

आपल्याच मतदारसंघातील, मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे प्रश्‍न, कुडाळ प्रांतांधिकारी यांची तक्रार करूनही चौकशी अहवालात क्‍लीन चीट मिळते, अशा अनेक अनेक प्रश्‍नांवर सत्तेत असून पण ते प्रश्‍न सोडवू शकत नाहीत, ते माजी पालकमंत्री यांच्या मतदार संघातील प्रश्‍न काय सोडवणार? माजी पालकमंत्र्यांनी जाहीर केलेला चष्म्याचा कारखाना कधी सुरू होणार?, नरेंद्र डोंगरमध्ये रोपवे कधी बसवणार? सावंतवाडी शहरातील अमेझॉन पार्कला पाच कोटी कधी मिळणार? सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कधी उभं राहणार? सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी पालकमंत्र्यांनी प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले त्याचे काय झाले?, मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे काय? आयटी हबमधून किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? आडाळी एमआयडीसीचे काय झाले? असे प्रश्‍न यावेळी विचारण्यात आले. 

काही प्रश्‍न
पालिकेच्या स्टॉल हटाव मोहिमेचे राजकारण करण्यासाठी शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख सावंतवाडीत येत आहेत? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आमदार नाईक देतील काय? आमच्या आमदारांनी आपल्या कार्यालयावरील फलक काढले ते लावतील की, कार्यालय बंद ठेवतील, तेही जाहीर करावे, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गवंडे व शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केला आहे.
Edited By- Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com