जुगारप्रकरणी बडे व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना वाढे येथील हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शनिवारी (ता. 3 एप्रिल) मिळाली होती.
 Satara police raids gambling den .jpg
Satara police raids gambling den .jpg

वाढे ( जि. सातारा) : येथील हॉटेलच्या खोलीत सुरु असणाऱ्या जुगार अड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकत सात जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांकडून 1 लाख 24 हजारांची रोख रक्कम, जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेले बडे व्यापारी आणि राजकीय पक्षाशी निगडीत आहेत.

सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना वाढे येथील हॉटेलमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शनिवारी (ता. 3 एप्रिल) मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना त्या हॉटेलवर छापा टाकत जुगार खेळणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकत त्या ठिकाणाहून अमोल चंद्रकांत पोपळे (रा. गुरुवार पेठ), कपिल रामस्वरुप अग्रवाल (रा. भोसले मळा, करंजे), राजू इक्‍बाल शेख (रा. कोरेगाव), नितेश जयवंत कदम (रा. मंगळवार पेठ, सातारा), विनायक भानुदास इथापे (रा. सदरबझार, सातारा), दिलीप नामदेव इरळे (रा. सैदापूर, ता. सातारा) तसेच हॉटेल मालक गणपतराव विलास नलवडे (रा. वाढे) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा सुमारे एक लाख 24 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी धोंडीराम हंकारे यांनी फिर्याद नोंदवली आहे. या प्रकरणी हॉटेलचालकावर देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com