केंद्रात आता कडक सहकार मंत्री आहे : पाशा पटेलांचा सहकारसम्राटांना इशारा   

राज्यात सध्या साखरेची एफआरपी आणि सहकार अशा दोन्ही क्षेत्रात शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
केंद्रात आता कडक सहकार मंत्री आहे : पाशा पटेलांचा सहकारसम्राटांना इशारा   
Pasha Patel .jpg

सोलापूर : या सगळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सहकार खाते तयार झाले. आता दिल्लीमध्ये सहकार खाते आले आहे. ते भी मंत्री कोण आहे माहितीय का तुम्हाला? असे समजून घ्या. एवढा कडक मंत्री केला (केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा) आहे. त्यामुळे सहकार खाते (Union Ministry of Co-operation) नीट झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी राज्यातील सहकार सम्राटांना सूचक इशारा दिला. (Regarding the Ministry of Co-operation, Pasha Patel said) 

राज्यात सध्या साखरेची एफआरपी आणि सहकार अशा दोन्ही क्षेत्रात शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. वेगवेगळ्या संस्थांनी सामान्य माणसांच्या अर्थकारणावर गदा आणली आहे. ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी केंद्रिय सहकार मंत्र्यांना कानमंत्र देणार का असा प्रश्न विचारला असता पाशा पटेल यांनी राज्यातल्या सहकार सम्राटांना सूचक इशारा दिला. 

शेतीमालाच्या पडलेल्या भावाच्या प्रश्नावर बोलताना पटेल यांनी केंद्राने चालू वर्षी उसाची एफआरपी ५० रुपयांनी वाढवली आहे. तर कालच राज्यात अतिरिक्त उत्पादित झालेला शेतीमाल राज्य सरकारने सरकारी हमी भावाने विकत घ्यावा.

त्यातील निम्मी रक्कम केंद्राने द्यायचा निर्णय केल्याचे सांगितले. यावेळी पटेल यांनी आपण बांबू लागवड चळवळीला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी राज्यभर फिरून शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे महत्व पटवून सांगणार, असल्याचे पटेल यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, संजीव करपे हे उपस्थित होते.  


 

Related Stories

No stories found.