राजू शेट्टींचे कोल्हापुरात आत्मक्‍लेश आंदोलन सुरू 

केंद्र सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही.
Raju Shetty's  agitation started in Kolhapur
Raju Shetty's agitation started in Kolhapur

कोल्हापूर : केंद्रातील मोदी सरकारने उद्योजकांच्या फायद्यासाठी केलेले तीन कृषी विधेयक रद्द करावेत. हे विधेयक रद्द केले नाहीत, तर केंद्र सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (ता. 3 डिसेंबर) दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आत्मक्‍लेश आंदोनल सुरू केले आहे. आज (ता. ) सायंकाळी 7 ते उद्या (शुक्रवारी ता. 4) सकाळी सातपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. यामध्ये रात्रभर भजन, कीर्तन करत आत्मक्‍लेश करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर आंदोलन सुरू केले आहे. 

शेट्टी म्हणाले, "मोदी सरकारने केलेल्या कृषी विधेयकाला देश आणि परदेशातूनही विरोध होत आहे. भारतातील शेतकऱ्यांची परदेशी सरकार घेत आहे. मात्र, मोदी सरकारला याचे काहीही घेणे देणे नाही. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणून ही नव नारायण सरकारला वठणीवर आणण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे.'' 

"शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कृषीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे किंवा त्याचा दर ठरवण्याची मुभा शेतकऱ्यांना दिली पाहिजे, ही या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. शिवाय सरकारने उद्योगपतींच्या हितासाठी तीन कृषी विधेयक मंजूर केली आहेत. ते तत्काळ रद्द करावेत. शेतकऱ्यांना अदाणी आणि अंबानींचे गुलाम करू नका. द्या, अशी मागणी केली जात आहे. मात्र, हे आंदोलन शिखांचे आहे. खलिस्तानवाद्यांचे आहे, असे म्हणून शेतकऱ्यांना हिनवले गेले आहे. या आंदोलनाला प्रांतीय आणि राजकीय रंग दिला आहे. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा आणू नये. त्यांना त्यांच्या हक्काची शेती करू द्यावी,'' अशी मागणी शेट्टी यांनी केली. 

"कायद्याने बंधनकारक असणारा हमीभाव मिळावा. पण, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रत्येकाला या आंदोलनात जावे असे वाटते. आपण जाऊ शकत नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेस आत्मक्‍लेश आंदोलन करावे लागले,' असेही शेट्टी यांनी सांगितले. 

या वेळी प्राध्यापक जालिंदर पाटील, युवराज पवार, विक्रम पाटील यांच्यासह विविध भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com