धक्कादायक : पंचायत समिती सभापतीने केला RTI कार्यकर्त्यावर गोळीबार - Panchayat Samiti chairperson fires on RTI activists | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : पंचायत समिती सभापतीने केला RTI कार्यकर्त्यावर गोळीबार

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 जून 2021

ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराची माहिती मागवल्याने गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. 

सोलापूर : पंचायत समिती सभापती अनिल डिसले यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते (RTI) प्रमोद ढेंगळे यांच्यावर गोळीबार केला आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती कारभाराची माहिती मागवल्याने गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. सभापती अनिल डिसले यांच्यावर वैराग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. (Panchayat Samiti chairperson fires on RTI activists)

भादवि 307, शस्त्र कायदा 3 आणि 25 नुसार अनिल डिसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैरागमधील जोतिबाचीवाडी गावात हा प्रकार घटला आहे.  

हे ही वाचा 

अनिल देशमुखांसाठी 29 जून ही महत्वाची तारीख : मोठ्या घडामोडींची शक्यता....
 
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने समन्स पाठवून पुन्हा मंगळवारी (ता. २९ जून) चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशमुख मंगळवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी शनिवारी (ता. २६ जून) देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, चौकशीचे मुद्दे कळल्यानंतरच उत्तरे देता येतील, अशी भूमिका घेत देशमुखांनी एकप्रकारे ईडीवर कुरघोडी केली होती.  

देशमुख यांच्या वकिलाने शनिवारी (ता. २६ जून) अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली होती. त्यानंतर आज (ता. २८ जून) पुन्हा ईडीने समन्स पाठवून मंगळवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

 देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर चार कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. या कंपन्या फक्त कागदोपत्री असून पैसे हस्तांतरणासाठी त्याचा वापर होतोय, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले. या कंपनीचे मालक असलेल्या जैन बंधूंचा जबाब नोंदवण्यात आला आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख