मी सभापती, आमदारही आमचाच, एक-दोन मर्डर सहज खपवू शकतो - Panchayat Samiti Chairman Anil Disley fires on RTI activists | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

मी सभापती, आमदारही आमचाच, एक-दोन मर्डर सहज खपवू शकतो

प्रशांत काळे 
मंगळवार, 29 जून 2021

पंचायत समितीचे विद्यमान सभापती अनील डिसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

बार्शी : बार्शी तालुक्यातील ज्योतिबाचीवाडी जवळगाव क्रमांक 2 येथे आरटीआय कार्यकर्त्यास अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. आरटीआय कार्यकर्ता पळून जात असताना पंचायत समितीचे सभापतींनी गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Panchayat Samiti Chairman Anil Disley fires on RTI activists)

पंचायत समितीचे विद्यमान सभापती अनील डिसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद गणपत ढेंगळे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 23 जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास ढेंगळे बसस्थानकावरुन घरी जात असताना घडली. वैराग पोलिसांनी मंगळवारी जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : अनिल देशमुखांना अटक होईल; सर्व पुरावे EDच्या हाती

कोल्हापूर महानिरीक्षक आणि सोलापूर जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेकडे 22 जून रोजी अनिल बाबुराव डिसले (सभापती) सुरेश विश्वनाथ कापसे, व्यंकटेश कृष्णाथ ढेंगळे यांचेपासून जीवाला धोका आहे, असल्याची लेखी तक्रार प्रमोद देंगळे यांनी दिली होती. ज्योतिबाची बसस्थानकावरुन घरी जात असताना 23 जून रोजी अनिल डिसले यांनी हाक मारुन मला थांबवले, तेथे जाताच डिसले यांनी माझ्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावली अश्लिल शिवीगाळ करीत तुला जीवंतच सोडत नाही, असे म्हणत असताना मध्यस्थीसाठी लहू डिसले आले. 

हे ही वाचा : शिवसेना आमदार सुहास कांदेंनी दिला चक्क आत्मदहनाचा इशारा

मी तालुक्याचा सभापती आहे, एक दोन मर्डर सहज खपवू शकतो, आमदार आमचाच आहे पोलिस त्यांचे खिशात आहे. तुम्ही अगोदर दिलेल्या तक्रारीचे पोलिसांनी काय केले तुम्हाला माहित आहे. असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथून पळून जात असताना पाठलाग केला, एक गोळी झाडल्याचा आवाज आला गोळी लागली नसल्याने थोडक्यात बचावलो घरात घुसून आतून कडी लावून घेतली.  त्यावेळी घरासमोर येऊन तुला जीवंत सोडणार नाही आमदार साहेबांसोबत बोलणे झाले आहे, आमदार साहेबांनी सांगितले आहे. तुमच्या राजकारणात येणाराला सरळ ठार मारा मी बघून घेतो काहीं काळजी करु नका, असे ढेंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस निरीक्षक विनय बहिर करीत आहेत.  

Edited By - Amol Jaybhaye 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख