राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फुंकले स्वबळाचे रणशिंग

पक्षात परत येऊन ती चूक सुधारण्याची संधी आली आहे.
NCP will contest elections on its own in Atpadi taluka
NCP will contest elections on its own in Atpadi taluka

आटपाडी : सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी आटपाडी तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गटातील निवडणुका पूर्ण तयार आणि ताकदीने स्वबळावर लढवयाचे रणशिंग पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी फुंकले. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. (NCP will contest elections on its own in Atpadi taluka)

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आज (ता. १० सप्टेंबर) मेळावा झाला. हणमंतराव देशमुख उद्‍घाटक, तर प्रमुख पाहुणे एन. पी. खरजे, विष्णुपंत चव्हाण होते. विलास नांगरे पाटील, विकास कदम, शहाजी पाटील, सुरज पाटील उपस्थित होते.

सर्वांच्याच भाषणाचा अजेंडा जिल्हा परिषदेची निवडणूक होती. निवडणूक स्वबळावर लढण्याबरोबर भाजपचे राजकारण, फसव्या घोषणा, ईडीचा गैरवापर, आरक्षण, बैलगाडा शर्यती, समाज- जातीवरून दिशाभूल करणारी वक्तव्ये यावर वक्त्यांनी टीकास्त्र सोडले होते. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्याच्या दृष्टीने आटपाडी तालुक्यातील चारही जागा स्वबळावर लढण्याचा सर्वांनीच निर्धार जाहीर केला. 

भास्कर नांगरे, हणमंत करांडे, सरपंच अलका करांडे, सरपंच परशुराम सरक, किशोर गायकवाड, जालिंदर कटरे, रणजीत पाटील, प्रा. संताजी देशमुख, काकासाहेब जाधव, भाऊसाहेब देशमुख उपस्थित होते.
 
राष्ट्रवादी  सोडून गेलेल्या नेत्यांना भावनिक साद

ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील यांनी देशमुख बंधूंचे नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून राजकारणात प्रवेश केला. चांगली भरारी घेतली. तरीही काहीजण पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. चूक सर्वांकडूनच होते. पक्षात परत येऊन ती चूक सुधारण्याची संधी आली आहे, तेव्हा तालुक्यातील राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यांनी परत येण्याची भावनिक साद पाटील यांनी घातली.

भारत पाटील, आनंदराव पाटलांची गैरहजेरी 

राष्ट्रवादीच्या पहिल्याच मेळाव्याला नुकताच पक्षात प्रवेश केलेले भारत पाटील, आनंदराव पाटील यांनी दांडी मारली. त्याची उलट-सुलट चर्चा उपस्थितांमध्ये होती. भारत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाअगोदर पत्रिका छापल्या होत्या. त्यांच्या नावाशिवाय छापलेल्या पत्रिकाचे कार्यकर्त्यांकडून केलेले वाटप, तर ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील यांचे नाव योग्य ठिकाणी वापरले नसल्याने ते नाराज झाल्याने दांडी मारल्याची चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com