अजितदादांची विनंती मान्य करत मनसे करणार भालकेंचा प्रचार

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे.
MNS to campaign for NCP candidate in Pandharpur .jpg
MNS to campaign for NCP candidate in Pandharpur .jpg

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू  असतानाच अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी मतदार संघात मोठे आव्हान उभे केले आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही निवडणूक प्रचारात उतरली आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याविषयी विनंती केली होती.

त्यानंतर आज दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीमध्ये पाठिंबा देण्याविषयी निर्णय देण्याचा घेण्यात आला. त्यानंतर धोत्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांना पाठिंबा दिल्याची माहिती दिली. यापूर्वीच्या पोटनिवडणुकीत मनसेने निधन झालेल्या सदस्यांच्या कुटुंबातील उमेदवाराला सहकार्य केले आहे. त्यानुसार पंढरपूरच्या निवडणुकीत ही भगिरथ भालकेंना पाठिंबा दिल्याचे धोत्रे यांनी स्पष्ट केले.

सोमवारपासून पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यात समांतर प्रचार यंत्रा राबवण्यात येणार असल्याचे ही धोत्रे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अनिल बागल, बाळासाहेब चौगुले, स्वप्नील जाधव, तेजस गांजाळे, नागेश इंगोले आदी उपस्थित होते.

संपूर्ण लाॅकडाऊनला मनसेचा विरोध 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंण्ड लाॅकडाऊन सुरू आहे. आणखी  कडक लाॅकडाऊन होण्याची शक्यता आहे. दरम्यान कडक निर्बंध आणि लाॅकडाऊनला मनसेने विरोध केला आहे. यासंदर्भात धोत्रे यांनी राज्य सरकारच्या लाॅकडाऊन धोरणांवर टीका करत लाॅकडाऊनला मनसेचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. 

Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com