आमदार अरुण लाड यांनी पदवीधरांसाठी सरकारकडे केली ही मागणी 

आमदार लाड हे पदवीधर मतदार संघातून विजयी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे.
MLA Arun Lad demands setting up of an independent mahamandal for graduates
MLA Arun Lad demands setting up of an independent mahamandal for graduates

मुंबई : राज्यातील पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे आणि त्याद्वारेच नोकर भरतीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी केली. त्याबाबत राज्य सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी विधान परिषदेतील चर्चेदरम्यान केली. 

एम्प्लॉयमेंट एक्‍सेन्ज विभागात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे पदवीधरांचा त्यावरील विश्वास उडाला आहे, असे आमदार अरुण लाड यांनी आपल्या भाषणातून सांगितले. आमदार लाड हे पदवीधर मतदार संघातून विजयी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यात पहिल्यांदा भूमिका मांडताना त्यांनी पदवीधरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाला हात घातला. 

आमदार लाड म्हणाले की अनुदानित शाळा संपण्याच्या मार्गावर आहेत. त्या टिकण्यासाठी शिक्षक भरती करून प्रत्येक तुकडीला एक शिक्षक नेमणे आवश्‍यक आहे. सामन्यांचे शिक्षण टिकवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. जर शिक्षणाचे खासगीकरण झाले तर सामान्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागेल. अनेक शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांच्या कामात दिरंगाई होते. वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांमुळे वैद्यकीय व्यवस्था कोलमडलेली दिसेल. यासाठी ही अत्यावश्‍यक सेवांची पदे तातडीने भरणे आवश्‍यक आहे. हे लाड यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले. 

शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याला मदतीची आवश्‍यकता आहे. ज्यांनी बॅंका बुडवल्या, त्यांना लाखो कोटींची मदत दिली जाते. शेतकऱ्याला मात्र तुटपुंजी मदत दिली जाते. हा दुजाभाव थांबवून शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चानुसार त्याने पिकवलेल्या मालाला हमीभाव देण्याची आवश्‍यकता आहे. दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी शाळांच्या माध्यान्ह भोजनात दुधाचा पुरवठा करावा, अशी मागणीही अरुण लाड यांनी या वेळी केली. 

हेही वाचा : भाजप खासदारांच्या बनावट जात प्रमाणपत्राचे 'उमरगा कनेक्‍शन' : गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी 

उमरगा : भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बनावट जातप्रमाणपत्र चौकशीच्या अनुषंगाने सोलापूरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने डिग्गी (ता. उमरगा, जि. लातूर) येथील ग्रामपंचायत सदस्य गुरूबसय्या स्वामी यांची चौकशी केली. दरम्यान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसीलदार संजय पवार यांची भेट घेऊन जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी केली. 

खासदार डॉ. महास्वामी यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्‍यक त्या पुराव्याची जमवाजमव "उमरगा कनेक्‍शन' मधून झाल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्‍यातील तलमोड येथील गुरूबसय्या स्वामी हा जुन्या काळातील व्यक्ती एका पाटलाचे शेत बटईने करत होता, त्या अनुषंगाने शेतजमिनीवर त्याचे नाव आले, अशी माहिती सांगितली जाते. जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे हा पुरावा सादर करण्यात आला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com