कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान होईलच : महादेव जानकर

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी ४ जूलैला राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
Mahadev Jankar .jpg
Mahadev Jankar .jpg

कोल्हापूर : मी कुणाचाही गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे अंतिम ध्येय हे दिल्ली आहे. कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होईन असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला. (Mahadev Jankar says one day will be the Prime Minister) 

जानकर कोल्हापुरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भारतीय जनता पक्षाचा (BJP) रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मी मात्र पाणंदीने पुढे चाललो आहे. माझाही सूर्य कधी तरी उगवेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी ४ जूलैला राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. बुधवारी सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ल्या झाला. त्या विषयी जाणकर यांना विचारले असता ते म्हणाले की पडळकर माझ्या पक्षात नाहीत, त्यांच्यावर बोलून त्यांना का मोठे करू.

भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी डोक्यावर ठेवलेला हात आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळें यांच्या विरोधात बारामतीतून दिलेली लढत. यामुळे जानकर चर्चेत आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र झाले. त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली. 

दरम्यान, महादेव जानकर यांनी मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरील अगस्तीमुनींच्या आश्रमात 2 दिवस मुक्काम केला होता. यावेळी त्यांनी किल्ल्यावर असलेले प्रभू रामचंद्र, ऋषी अगस्तीमुनींच्या मंदिर आणि मोठे बाबाच्या दरगाह इथे जाऊन दर्शन घेतले. शिवाय महंत ज्ञानगिरी महाराज यांच्यासोबत गप्पा मारून किल्ल्याची माहिती जाणून घेतली होती.  

महादेव जानकर यांनी त्यांच्या या मुक्कामाबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. त्यांनी मीडियाला आणि लोकांना भेटण्याचे देखील टाळले. अंगावर भगवी शाल घेउन जानकार यांनी किल्ल्यावरील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतला होता. अचानक ते या किल्ल्यावर दोन दिवस का थांबले. त्यांच्या मनात काय चालले. ते अस्वस्थ तर नाही ना? मनाला शांती मिळावी यासाठी ते या किल्ल्यावर आले होते का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. 
Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com