कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोना दुसऱ्या लाटेचे नियोजन सुरु

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता गृहित धरुन जिल्हा प्रशासनाने नियोजनास सुरुवात केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच खाजगी रुग्णालयांशी संपर्क सुरु केला आहे. मागील आठ महिन्यात एका दिवसात जी उच्चांकी रुग्णसंख्या झाली होती त्यामध्ये १० टक्‍के वाढ करुन बेडचे नियोजन लावले जात आहे
Kolhapur Zilla Parishad Preparing to Face Second wave of Corona
Kolhapur Zilla Parishad Preparing to Face Second wave of Corona

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता गृहित धरुन जिल्हा प्रशासनाने नियोजनास सुरुवात केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच खाजगी रुग्णालयांशी संपर्क सुरु केला आहे. मागील आठ महिन्यात एका दिवसात जी उच्चांकी रुग्णसंख्या झाली होती त्यामध्ये १० टक्‍के वाढ करुन बेडचे नियोजन लावले जात आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकाच दिवसात १२००  रुग्ण सापडले होते. आता साधारणपणे १३०० ते १४०० रुग्ण गृहित धरुन बेड, ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

देशात काही ठिकाणी कोरोनाची तिसरी तर काही ठिकाणी दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. राजधानी दिल्ली येथे कोरोनाची तिसरी लाट व त्या अनुषंगाने लॉकडाउनचे नियोजन सुरु झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य यंत्रणेनेही आढावा घेवून जिल्हा प्रशासनाला याबाबत सुचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्याचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात मागील आठ महिन्यांपासून आजअखेर कोरोनाचे ४८ हजार ७७३ रुग्ण सापडले आहेत. तर आत्तापर्यंत ४६ हजार ५११ रुग्ण कोरोना मुक्‍त झाले आहेत. कोरोनामुळे काल अखेर १६६८ रुग्णांचा मृत्युही झाला आहे. जिल्ह्यात १५ ऑक्‍टोबरपासून रुग्णसंख्या कमी होत गेली आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असतानाच जनजीवन पुर्वपदावर येत आहे. विविध सण व उत्सवांमुळे आता रस्त्यावर व बाजारपेठांमध्ये गर्दी होवू लागली आहे. या गर्दीत बरेच लोक कोरोनाच्या सुचनांचे पालन करत नसल्याने पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्‍त केली जात आहे. राजधानी दिल्लीचा अनुभव विचारात घेवून जिल्ह्यात तयारी सुरु झाली आहे. जिल्ह्यात उच्चांकी रुग्ण दाखल होण्याचे गृहित धरुन तयारी सुरु झाली आहे. जर एका दिवसात १३०० ते १४०० रुग्ण दाखल झाले तर यातील ४० टक्‍के रुग्णांवर घरीच उपचार केले जाणार आहेत. ४५ टक्‍के रुग्ण हे कोवीड सेंटरमध्ये दाखल केले जाणार आहेत. तर १२ टक्‍के लोकांना ऑक्‍सीजन तर ३ टक्‍के लोकांना व्हेंटिलेटर लागण्याची शक्‍यता गृहित धरुन ही तयारी सुरु करण्यात आली आहे.

कोरोनाची संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेवून उपलब्ध साधनसामग्री म्हणजे बेड, ऑक्‍सीजन बेड, व्हेंटिलेटर याची व्यवस्था तपासण्यात येत आहे. ही यंत्रणा पुरेशी असेल तर ती सर्व कार्यान्वित करणे अथवा कमी पडेत असेल तर त्यासाठी तरतुद करण्याच्या अनुषंगाने आढावा सुरु झाला आहे. आठवडाभरात सर्व तयारी पूर्ण होईल. - डॉ.योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
Edited By - Amit Golwalkar 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com