कऱ्हाड जि.प. चे माजी सदस्य जितेंद्र पवार भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि केलेली विकास कामे याचा विचार करुन मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जितेंद्र पवार यांनी पुन्हा हातात घड्याळ बांधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
Karad BJP Leader Jitendra Pawar Enters NCP Again
Karad BJP Leader Jitendra Pawar Enters NCP Again

कऱ्हाड :  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि केलेली विकास कामे याचा विचार करुन मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जितेंद्र पवार यांनी पुन्हा हातात घड्याळ बांधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवार यांनी २०१७ मध्ये पुसेसावळी जिल्हा परिषद गटात पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समितीचे तिकीट न मिळाल्याने नाराज होवुन बंडखोरीचे निशाण हाती घेतले. अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी अपक्ष उमेदवारी करून तब्बल सहा हजार मते मिळवली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज असलेल्या पवार यांना भाजपने पक्षात घेतले. जानेवारी २०२० मध्ये हरणाई सुत गिरणीवर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. तेव्हापासून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खटाव तालुक्‍यात चर्चा सुरू होती. 

सहकारमंत्री पाटील यांनीही मतदारसंघ मजबूत करण्याकडे लक्ष दिले आहे. मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. जोतिराम थोरात, भाऊसाहेब लादे, शिवाजी शिंदे, महादेव माने, पांडुरंग माने, श्रीमंत कदम, साधू मगर, बजरंग पवार, बापूराव माने, निवास पवार, धोंडीराम जगताप, श्री. मदने गुरुजी, दादासाहेब कदम, धनाजी पाटील, दिलीप यादव, दिनकर पाटील, सुदाम पिसाळ, दाऊद पटेल, तुषार माने, सचिन माने, अविनाश घार्गे, विजय पिसाळ, दादासाहेब दगडे, प्रताप शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com