वडिलांचा कोरोनाने मृत्यू; युवा पत्रकाराची नैराश्येतून आत्महत्या...

प्रकाश जावध व त्यांच्या घरातील सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली होती.
 Prakash Jadhav .jpg
Prakash Jadhav .jpg

सोलापूर : राज्यात कोरोणाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. रुग्णांना बेड,  रेमडेसिव्हीर इंजेक्शन, ऑक्सिजन मिळत नसल्याने प्रचंड भयावर परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पाहून व वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने, पत्रकार प्रकाश जाधव यांनी आत्महत्या केली. प्रकाश यांच्या वडिलांवर गुरुवारी अंत्यसंस्कार करायचे होते, मात्र पित्याच्या मृत्यूने खचलेल्या मुलाने स्वतःची जीवनयात्रा त्यांच्या अगोदर संपवली.  

प्रकाश जावध व त्यांच्या घरातील सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे प्रकाश (वय 35 वर्ष ) यांनी नैराश्यात जाऊन हाताची नस कापून  घरीच आत्महत्या केली. प्रकाश हा संगमेश्वर महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेऊन प्रथम क्रमांकान उत्तीर्ण झालेला आणि अनेक दैनिकांमध्ये काम करणाऱ्या या युवा पत्रकाराने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रकाशची आई आणि वहिनी कोरोना पॉसिटीव्ह असल्याने त्यांच्यावर ही सोलापुरातील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. घरातील साऱ्याच व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने प्रकाश आणि भाऊ सतीश हे दोघंही विलगीकरणात राहत होते, मात्र मानसिक मनोबल खचलेल्या प्रकाशने टोकाचे पाऊल उचलून स्वतःची जीवनयात्रा संपवली. प्रकाश याने डाव्या हाताची नस कापल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

त्याचा भाऊ सतीश जाधव हा सोलापूर शहर पोलिस दलात कार्यरत आहे. प्रकाश जाधव सारख्या हरहुन्नरी युवा पत्रकाराने आत्महत्या केल्याने सोलापुरातील पत्रकारांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दररोज ५० हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाबाधितांसाठी बेड शिल्लक नाहीत. संपूर्ण राज्यभरात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. दोन दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात 10 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. दुसरीकडे कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांची प्रचंड हेळसांड होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com