जयंत पाटलांनंतर मुलगा प्रतीक यांनाही कोरोनाची लागण 

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्या अनुपस्थितीत प्रतीक पाटील हे संपूर्ण मतदारसंघात सक्रिय असतात.
Jayant Patil's son Prateek Patil also tested positive for corona
Jayant Patil's son Prateek Patil also tested positive for corona

इस्लामपूर (जि. सांगली) : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव, सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, युवा नेते प्रतीक पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्या अनुपस्थितीत प्रतीक पाटील हे संपूर्ण मतदारसंघात सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच मंत्री पाटील हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ते सध्या मुंबई येथे क्वारंटाइन आहेत. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रतीक पाटील यांनी तत्काळ स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले होते. आता त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

प्रतीक पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार घरी मी विलगीकरणात आहे. काळजी नसावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा.' 

हेही वाचा : वडील पवारसाहेबांमुळे, तर मी अजितदादांमुळे झेडपीवर गेलो, त्यामुळे मी आजन्म पवार गटाचाच 

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : बारामती तालुक्‍यातील निंबुत ग्रामपंचायतीचा सरपंच आरक्षणामुळे विरोधी गटाचा झाला असला तरी बहुमत आमच्या महाविकास आघाडीकडेच आहे, अशी भूमिका जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी मांडली. तसेच "मीही जन्मापासून पवार गटाचाच आहे, हे संपूर्ण परिसरास ज्ञात आहे,' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

निंबुत (ता. बारामती) ग्रामपंचायतीत शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलला पंधरापैकी नऊ जागा मिळाल्या होत्या. विरोधी गटाच्या सोमेश्वर पॅनेलला सहा जागा मिळाल्या होत्या. सरपंचपद मात्र अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित होते. सोमेश्वर पॅनेलकडून अनुसूचित जमातीच्या एकमेव निवडून आलेल्या उमेदवार निर्मला काळे यांना सरपंचपदाच्या खुर्चीवर बसण्याची संधी मिळाली. सोमेश्वर पॅनेल राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याने "पवार गटाचा निंबुत ग्रामपंचायतीत पहिलाच सरपंच' असा दावा करण्यात आला होता. त्या पार्श्‍वभूमीवर काकडे बोलत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com