आजी काळजी करू नका; ९० वर्षांच्या आजीबाईंना मंत्री जयंत पाटील यांनी दिला धीर - Jayant Patil Visited Corona Ward at Sangli | Politics Marathi News - Sarkarnama

आजी काळजी करू नका; ९० वर्षांच्या आजीबाईंना मंत्री जयंत पाटील यांनी दिला धीर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डला आज भेट दिली. यावेळी त्यांनी पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली व त्यांना मानसिक व शाब्दिक आधार दिला

सांगली : "आता कसं वाटतंय आजी .... काही काळजी करू नका... दोन - तीन दिवसात बर्‍या व्हाल..." असा धीराचा शब्द सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९० वर्षांच्या आजींना दिला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डला आज भेट दिली. यावेळी त्यांनी पीपीई किट घालून रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस केली व त्यांना मानसिक व शाब्दिक आधार दिला.

दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णालयाच्या विभागप्रमुखांसह बैठकही घेतली व रुग्णालयातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. लवकरच आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरू. इथला प्रत्येक रुग्ण या रोगावर मात करणार व माझे सांगलीकर या संकटाला हरवणार याची मला खात्री आहे असा विश्वासही पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांनी व्यक्त केला.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख